advertisement

विमान हजारो फूट उंचावर झेपावताच प्रवासी बेशुद्ध; MBBS चा विद्यार्थी मदतीसाठी पुढे आला अन्... मुंबई-गोवा फ्लाईटमधील तो थरार

Last Updated:

हजारो फूट उंचावर हवेत झेपावलेल्या विमानात जेव्हा एका प्रवाशाचा श्वास अडकला आणि मृत्यू समोर दिसू लागला, तेव्हा डहाणूच्या एका वैद्यकीय विद्यार्थ्याने दाखवलेले प्रसंगावधान त्या प्रवाशासाठी 'संजीवन' ठरले.

आर्यन लोलीयेकरने वाचवले प्राण
आर्यन लोलीयेकरने वाचवले प्राण
(राहुल पाटील, प्रतिनीधी) मुंबई : हजारो फूट उंचावर हवेत झेपावलेल्या विमानात जेव्हा एका प्रवाशाचा श्वास अडकला आणि मृत्यू समोर दिसू लागला, तेव्हा डहाणूच्या एका वैद्यकीय विद्यार्थ्याने दाखवलेले प्रसंगावधान त्या प्रवाशासाठी 'संजीवन' ठरले. डहाणू येथील वेदांता मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या आर्यन लोलीयेकर याने एका सहप्रवाशाचा जीव वाचवून सर्व स्तरांतून कौतुक मिळवले आहे.
नेमकी काय घडली घटना?
३ फेब्रुवारी रोजी आर्यन गोव्याच्या दाबोलीम विमानतळावरून मुंबईकडे इंडिगोच्या विमानाने प्रवास करत होता. विमान हवेत असतानाच अचानक एका सहप्रवाशाला श्वसनाचा तीव्र त्रास सुरू झाला आणि तो शुद्ध हरपून खाली कोसळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्रू मेंबर्सनी "विमानात कोणी डॉक्टर आहे का?" अशी विचारणा केली. मात्र, विमानात एकही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हता.
advertisement
आर्यनचा धाडसी पुढाकार
अशा कठीण प्रसंगी आर्यनने स्वतःहून पुढे येत आपली ओळख सांगितली आणि उपचार सुरू केले. तपासणीअंती असे लक्षात आले की, रुग्णाच्या रक्तातील साखर (Sugar Level) कमालीची घटली असून हृदयाचे ठोकेही मंदावले आहेत. आर्यनने वेळ न घालवता विमानात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला आणि आवश्यक प्रथमोपचार देऊन पुढील ४५ मिनिटांत रुग्णाची प्रकृती स्थिर केली.
advertisement
प्रॅक्टिकल नॉलेजचा झाला फायदा
विमान मुंबईत उतरताच इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आर्यनच्या या कामगिरीबद्दल बोलताना वेदांता मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी सार्थ अभिमान व्यक्त केला. महाविद्यालयात दिले जाणारे प्रॅक्टिकल ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवामुळेच आर्यन इतक्या दबावाखालीही एकाचा जीव वाचवू शकला, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
विमान हजारो फूट उंचावर झेपावताच प्रवासी बेशुद्ध; MBBS चा विद्यार्थी मदतीसाठी पुढे आला अन्... मुंबई-गोवा फ्लाईटमधील तो थरार
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement