मुंबईत बिझनेसमनच्या मुलीचं टोकाचं पाऊल, 23 व्या मजल्यावरून मारली उडी, कारण समोर

Last Updated:

मुंबईच्या गोरेगाव परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका निवासी इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

Ai generated Photo
Ai generated Photo
मुंबईच्या गोरेगाव परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका निवासी इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. पीडित विद्यार्थिनी मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी तिने अचानक २३ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात असलेल्या ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये आपल्या पालकांसोबत राहत होती. तिचे वडील व्यावसायिक आहेत. ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत होती. अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीवर गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाचं मोठं दडपण होते. या ताणामुळे ती मानसिक नैराश्यात गेली . तिची तब्येत बिघडत असल्यामुळे तिच्यावर धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु तिच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
advertisement
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ती आपल्या २३व्या मजल्यावरील बेडरूममध्ये होती. त्याचवेळी तिने खिडकीतून उडी घेऊन स्वतःचे जीवन संपवले. इमारतीच्या खाली मोठा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तात्काळ तिच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. तिला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासाच्या तणावामुळे ती नैराश्यात होती आणि तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या पालकांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला. या प्रकरणी आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची (Accidental Death Report - ADR) नोंद केली आहे. एका गुणी आणि तरुण मुलीच्या अशा अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत बिझनेसमनच्या मुलीचं टोकाचं पाऊल, 23 व्या मजल्यावरून मारली उडी, कारण समोर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement