भाजपचं मुंबईत UP कार्ड, ठाणे-मिरा भाईंदर-भिवंडी; कुठे किती उत्तर भारतीय मैदानात उतरवले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ठाणे, मिरा- भाईंदर, केडीएमसी, उल्हासनगर आणि भिवंडीत देखील उत्तर भारतीय उमेदवारांना देखील महापालिकेची उमेदवारी दिली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी हा वाद निर्माण झालेला आहे. त्यातच मिरा भाईंदरमध्ये भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी येवढे नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वाद आणखीच पेटला आहे. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीने 99 टक्के मराठी उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तर युती विरोधात मुंबईत भाजपने 92 मराठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर, 45 इतर भाषिक उमेदवार आहेत . यामध्ये 15 उत्तर भारतीय उमेदवार आहेत
मुंबईचा महापौर मराठीच असणार हे ठाकरे आणि महायुतीनं ठासून सांगितलंय. त्यासाठी त्यांची जोरदार तयारीही सुरू झालीय. परिणामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरायला सुरूवात झालीय. दुसरीकडे मराठी महापौर करण्यासाठी राजकीय पक्षांना व्होट बँकेवर भर दिल्याचं स्पष्ट होतंय. कारण व्होट बँक जपली तरच विजयाचा मार्ग सोपा होणार आहे, हे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप उमेदवारांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं. फक्त मुंबईतच नाही तर मुंबईच्या आसपास असणाऱ्या ठाणे, मिरा- भाईंदर, केडीएमसी, उल्हासनगर आणि भिवंडीत देखील उत्तर भारतीय उमेदवारांना देखील महापालिकेची उमेदवारी दिली आहे.
advertisement
कुठे कुठे किती उत्तर भारतीय उतरवले?
उत्तर भारतीय आता केवळ स्थलांतरीत राहिलेले नसून ते एक राजकीय ताकद बनलेत. कारण लोकशाहीत संख्या राजकीय ताकद असते. त्यामुळे भाकरीसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीयांची राजकीय भूक जागृत होणं स्वाभाविक आहे. महापौरपदासारखं स्थानिक सत्तेचं सर्वोच्च पद त्यांना खुणावतंय. भाजपने देखील ठाण्यात 2, मिरा- भाईंदर 14, कल्याण डोंबिवली 2 , भिवंडी 1, उल्हासनगरमध्ये 10 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
महानगरपालिका निहाय आकडेवारी
| महापालिका | मराठी | उत्तर भारतीय | इतर |
| मुंबई | 92 | 15 | 30 |
| ठाणे | 30 | 2 | 8 |
| मिरा भाईंदर | 39 | 14 | 34 |
| कल्याण-डोंबिवली | 51 | 2 | 7 |
| उल्हासनगर | 38 | 10 | 30 |
| भिवंडी | 21 | 1 | 3 |
advertisement
अमराठींना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात
अमराठींना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर भाजप मराठीचा सन्मान करत समतोल साधत असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात भाजपने भाषिकांच्या प्राबल्यावर उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणजे गुजराती भाषिकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी गुजराती भाषिक उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहेत. 15 उत्तर भारतीय उमेदवार तर 30 इतर समाजातील उमेदवारांना भाजपने तिकीट दिले आहे. मीरा भाईंदरमध्ये देखील 14 उत्तर भारतीयांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 9:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
भाजपचं मुंबईत UP कार्ड, ठाणे-मिरा भाईंदर-भिवंडी; कुठे किती उत्तर भारतीय मैदानात उतरवले?











