advertisement

22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरसोबत अश्लील कृत्य, मुंबईत भररस्त्यात विचित्र प्रकार

Last Updated:

मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २२ वर्षीय प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने अनोळखी व्यक्तीने आपला विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

News18
News18
मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २२ वर्षीय प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने अनोळखी व्यक्तीने आपला विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर एक विस्तृत पोस्ट लिहून तिने या घटनेची माहिती दिली. एका इन्फ्ल्यूएन्सरची अशाप्रकारे भररस्त्यात छेड काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत गोरेगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, सध्या या प्रकरणातील आरोपीचा कसून शोध सुरू आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. ती गोरेगाव पश्चिम येथील एका पुलाजवळ आपल्या मोबाइलवर बोलत उभी होती. याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिच्याजवळ येऊन तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि त्वरित तो पूल ओलांडून पळून गेला.

वाहतूककोंडीमुळे आरोपी निसटला

या अनपेक्षित घटनेमुळे गोंधळलेल्या अवस्थेतही तरुणीने त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या भागातील तीव्र वाहतूककोंडीमुळे तिला त्याचा माग काढणे शक्य झाले नाही. तसेच रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनीही या तरुणीला कोणतीही मदत केली नाही. "विनयभंगाच्या घटनेनंतर मी रस्त्याच्या मधोमध रडत होते आणि मदतीसाठी ओरडत होते," असे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
advertisement

पोलीस हेल्पलाइननेही दिला नाही प्रतिसाद?

या घटनेनंतर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून तिच्या कोणत्याही कॉलला उत्तर देण्यात आले नाही, असंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एकीकडे महिला सुरक्षेचे दावे केले जात असताना, एका लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरसोबत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरसोबत अश्लील कृत्य, मुंबईत भररस्त्यात विचित्र प्रकार
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement