advertisement

पोलिस कंट्रोल रूमला फोन आला अन्...;चर्चगेटमधील गार्डनमधून समोर आलं भयानक कांड

Last Updated:

Mumbai Shocking Crime : चर्चगेट परिसरातील गार्डनमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू आहे. नेमकं घडलं काय आणि कधीयाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

चर्चगेट परिसरातील गार्डनमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू
चर्चगेट परिसरातील गार्डनमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू
मुंबई : मुंबई शहरातील प्रसिद्द असलेल्या चर्चगेट परिसरात एका गार्डनमध्ये घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे मोठई खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना समोर आली. एका 55 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीकडून खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मृत व्यक्तीचे नाव राहुल पंजवानी उर्फ पंजाबी असे असून ते चर्चगेट परिसरातच राहत होते. घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
उद्यानात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस नियंत्रण कक्षाला संध्याकाळी एका व्यक्तीचा कॉल आला. ज्या कॉलमध्ये चर्चगेटमधील एका गार्डनजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही उशीर न करता घटनास्थळ गाठले.
advertisement
पोलिस घटनास्थळी पोहचले असता राहुल पंजवानी हे गंभीर अवस्थेत जखमी आढळून आले. पोलिसांना त्यांच्या शरीरावर मारहाणीचे आणि हल्ल्याचे वार स्पष्ट दिसत होते. नंतर पोलिसांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.
चर्चगेट हत्या प्रकरणाचा तपास वेगात
अचानक गार्डनसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकार घटना घडणे ही गंभीर गोष्ट मानली जात आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या खुनामागील नेमके कारण समोर आले नाही. नेमका वैयक्तित वाद, आर्थिक कारण आहे किंवा इतर कोणते कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहे. तपासाला वेग मिळण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष टीम काम करत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
पोलिस कंट्रोल रूमला फोन आला अन्...;चर्चगेटमधील गार्डनमधून समोर आलं भयानक कांड
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement