advertisement

POD Taxi : मुंबईकरांचा प्रवास आता हवेतून! सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा अपडेट

Last Updated:

Pod Taxi Update News : मुंबईकरांचा प्रवास आता वाहतूककोंडीतून कमी होणार आहे. आता मुंबईतील पॉड टॅक्सीची सेवा येत्या काही दिवसांत सुरु होणार असून त्याच्या उद्घटनाची तारीख आता समोर आलेली आहे.

मुंबईकरांसाठी पॉड टॅक्सी सेवा 3 एप्रिल पासून  सुरूहोणार असून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
मुंबईकरांसाठी पॉड टॅक्सी सेवा 3 एप्रिल पासून सुरूहोणार असून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
मुंबई : मुंबईतील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पॉड टॅक्सीच्या उद्घाटनाची तारीख समोर आलेली आहे. पॉड टॅक्सी ही कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्या धावणार असून वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय ही सेवा ठरणार आहे.
कधी पासून करता येणार प्रवास?
वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खूप प्रवा करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा कामाच्या वेळेतच ट्राफिकची समस्या येते. त्यामुळे वाहतूकीवरील ताण कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 3 एप्रिल रोजी याचे उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर ही पॉड टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
advertisement
जाणून घ्या या नवीन सेवेची सर्व वैशिष्ट्ये
पॉड टॅक्सीचा फायदा कुर्ला ते वांद्रे दरम्यान दररोज येणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. पॉड टॅक्सी ही पूर्णपणे ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेहईकल आहे. एका टॅक्सीत एका वेळीत साधारण 8 प्रवासी बसू शकतात आणि उभे राहून 13 प्रवासी प्रवास करु शकतात.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
POD Taxi : मुंबईकरांचा प्रवास आता हवेतून! सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा अपडेट
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement