Mumbai Metro: भुयारी मेट्रोचा ‘तो’ निर्णय वादात, मुंबईकरांना करावा लागणार खासगी बसचा प्रवास, कारण काय?

Last Updated:

Mumbai Metro: मुंबई मेट्रोने ‘बेस्ट’ला डावलून खासगी कंपनीची फीडर बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार असल्याने संताप व्यक्त होतोय.

भुयारी मेट्रोचा ‘तो’ निर्णय वादात, मुंबईकरांना करावा लागणार खासगी बसचा प्रवास, कारण काय?
भुयारी मेट्रोचा ‘तो’ निर्णय वादात, मुंबईकरांना करावा लागणार खासगी बसचा प्रवास, कारण काय?
मुंबई: मुंबईत आता मेट्रोचे जाळे वेगाने वाढत आहे. लोकल ट्रेन, बेस्ट बस आणि मेट्रो — ही तिन्ही साधनं आज मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाची लाईफलाइन बनली आहेत. नुकतीच सुरू झालेली मेट्रो 3 म्हणजेच भुयारी मेट्रो या प्रवासात अजून एक महत्त्वाची भर ठरली आहे. पण आता या मार्गिकेवरील फीडर बस सेवेवर वाद निर्माण झाला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) बीकेसी, वरळी आणि सीएसएमटी या स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी कंपनी सिटीफ्लो सोबत करार केला आहे. या फीडर बसमुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनहून जवळच्या कार्यालयांपर्यंत सहज पोहोचता येईल. मात्र, बेस्टऐवजी खासगी बससेवेशी करार केल्याने टीका होत आहे.
advertisement
जास्त भाड्याचा मुद्दा
सिटीफ्लोच्या बससाठी किमान भाडे 29 रुपये ठेवण्यात आले आहे. हे बेस्टच्या किमान भाड्यापेक्षा तब्बल अडीच पट जास्त आहे. त्यामुळे आधीच प्रवासी घट आणि तोट्याच्या समस्येला तोंड देणाऱ्या बेस्टच्या अडचणीत आणखी भर पडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सिटीफ्लोच्या बसेसचा मार्ग मेट्रो स्थानकांपासून प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत असेल.
बीकेसी मार्ग: एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय परिसर
advertisement
वरळी मार्ग: सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क
सीएसएमटी मार्ग: जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस. पी. मुखर्जी चौक, के. सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी परिवहन विभागाने सिटीफ्लो आणि उबरच्या ॲप-आधारित बससेवांवर परवानगी नसल्याने कारवाई केली होती. आता त्याच कंपनीसोबत एमएमआरसीने करार केल्याने निवड प्रक्रियेतील निकषांविषयी विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: भुयारी मेट्रोचा ‘तो’ निर्णय वादात, मुंबईकरांना करावा लागणार खासगी बसचा प्रवास, कारण काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement