मामा-भाचीचं गुपित फुटलं, नवऱ्याला मिळाला बायकोचा अश्लील व्हिडिओ; पतीचं टोकाचं पाऊल, नवी मुंबई हादरली

Last Updated:

वैष्णवीचे तिच्या मामाशी सतत फोनवर बोलणे, वारंवार चॅटिंग या गोष्टी पती विनोदला खटकत होत्या.

Ai generated image
Ai generated image
नवी मुंबई : पत्नी आणि तिच्या मामाकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला आणि सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या अश्लील व्हिडिओंना कंटाळून २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रबाळे परिसरात उघडकीस आली आहे. विनोद श्रीमंत तुपसौंदर (27) या तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाची पत्नी व तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार विनोदचा विवाह सहा महिन्यांपूर्वी नाशिकच्या वैष्णवीसोबत झाला होता. लग्नानंतर
दोन-तीन महिने संसार एकदम सुखाचा झाला. मात्र गेल्या काही महिन्यात दोघांमध्ये वाद सुरु झाला. वैष्णवीचे तिच्या मामाशी सतत फोन वर बोलणे, वारंवार चॅटिंग या गोष्टी पती विनोदला खटकत होत्या. याविषयी वैष्णवीला वारंवार समजावले मात्र तरीही तिने संवाद सुरूच ठेवला. अखेर त्यांचा वाद एवढा विकोपाला गेला की वैष्णवीच्या माहेरपर्यंत गेला.
advertisement

लेकीचा संसार वाचवण्यासाठी माहेरतची मंडळी आली

लेकीचा संसार वाचवण्यासाठी वैष्णवीच्या घरचे नवी मुंबईला रबाळे येथे आली होती. मात्र, वाद मिटण्याऐवजी तो अधिकच विकोपाला गेला आणि वैष्णवी आपल्या माहेरी निघून गेली. वैष्णवी घर सोडून गेल्यावर विनोदच्या इन्स्टाग्रामवर अचानक त्याच्या पत्नीचे काही अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आले. हे व्हिडीओ मामा संतोष ढगे यानेच विनोदला मानसिक त्रास देण्यासाठी पाठवल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement

पत्नीचे अश्लिल व्हिडीओ पाहून पतीला धक्का

आपल्या पत्नीचे असे व्हिडीओ पाहून विनोदला प्रचंड मानसिक धक्का बसला. समाजातील बदनामी आणि पत्नीचे वागणे सहन न झाल्याने त्याने 25 सप्टेंबरच्या पहाटे राहत्या घरात गळफास घेतला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मामा- भाचीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

advertisement
विनोदच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पत्नी वैष्णवी आणि मामा संतोष ढगे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील ते चॅट्स, पाठवलेले व्हिडीओ आणि फोन कॉल्सचे रेकॉर्ड आता पोलिसांच्या तपासाचा मुख्य भाग असणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मामा-भाचीचं गुपित फुटलं, नवऱ्याला मिळाला बायकोचा अश्लील व्हिडिओ; पतीचं टोकाचं पाऊल, नवी मुंबई हादरली
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement