ठाणे-मुलुंड दरम्यान नवं रेल्वे स्टेशन, 'कोपरी-चेंदणी' नाव देण्याची मागणी; कारण काय ?
Last Updated:
Thane News : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या दिवसांपासून ठाणे ते मुलुंड दरम्यान एका नव्या स्थानकाची चर्चा होत आहे. मात्र आता त्याच्या एका नव्या नावावरुन पुन्हा एकदा चर्चा होत असून ते नाव देण्याची मागणी होत आहे.
ठाणे : ठाणे आणि मुलुंड दरम्यान एका नव्या रेल्वे स्थानकाची आणि त्याबाबतच्या नावाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली. नेमका प्रवाशांना या स्थानकातून कधीपासून प्रवास करता येणार किंवा अजून काही माहिती समोर आलेली आहे त्या विषयी जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्याने उभारल्या जाणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला आता 'कोपरी-चेंदणी' असे नाव देण्यात येऊन इथल्या मूळ रहिवाशांचा सम्ना करवा, अशी मागणी ही ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ.प्रशांत सिनकर यांनी केलेली आहे. त्याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नेरंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
advertisement
16 एप्रिल 1853 रोजी जेव्हा देशातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती. तेव्हा त्या प्रवासासाठी चेंदणी येथे राहत असलेल्या कोळीवाड्यातील कोळी समाजाने त्यांच्या जमिनींचा मोठा त्याग केला होता. याचप्रमाणे ठाणे पूर्व भागातील कोपरी गावातील आगरी समजानेही शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले होते. पण वाढत्या शहरीकरणामुळे चेंदणी कोळीवाडा हा दोन भागांत विभागला गेला त्यामुळे समाचाजी ओळख पुसली जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
advertisement
शिवाय डॉ.प्रशांत सिनकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या स्थानकाचे नामकरण हे ठाण्याच्या मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाचा आणि गौरवाचा प्रश्न आहे. आगरी आणि कोळी समाजाची संस्कृती आणि त्यांचे हे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या स्थानकाला कोपरी-चेंदणी हे नाव देणे महत्त्वाचेच आहे.मात्र आता सरकार आणि रेल्वे प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्व ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 10:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ठाणे-मुलुंड दरम्यान नवं रेल्वे स्टेशन, 'कोपरी-चेंदणी' नाव देण्याची मागणी; कारण काय ?








