advertisement

'चांगला नवरा करायचाय', दुसऱ्या लग्नासाठी विवाहितेकडून पोटच्या बाळाची हत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

Last Updated:

Pune News: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात एका महिलेनं आपल्या अकरा महिन्यांच्या बाळाची अमानुष हत्या केली आहे.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
सचिन तोडकर, प्रतिनिधी शिरूर: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात आई आणि बाळाच्या नात्याला कलंक फासणारी घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या अकरा महिन्यांच्या बाळासोबत अमानुष कृत्य केलं आहे. तिने बाळाला सिमेंटच्या ओट्यावर आपटून जीव घेतला आहे. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पुरावा नष्ट करण्यासाठी बाळाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आहे. तिने दुसरं लग्न करण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा पतीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.
पूजा रवींद्र पवार असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. तर यश रवींद्र पवार असं हत्या झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात घडली असून मुलाचं वय अवघं अकरा महिने इतकं होतं. महिलेनं पोटच्या बाळाला घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून जीव घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावाचे रहिवाशी रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात आपल्या अकरा महिने वयाच्या मुलाचा मृत्यूची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फिर्यादी रवींद्र पवार यांची पत्नी पूजा रवींद्र पवार यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिल. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
कोकण फिरून आल्यापासून बाळ सारखं रडत आहे. चांगला नवरा शोधून दुसरं लग्न करावं, असा विचार आपल्या डोक्यात आला होता. मूल सोबत असेल तर दुसरं लग्न करता येणार नाही. त्यामुळे हा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या मुलाचाच जीव घेतल्याचे व मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले.
आरोपी महिलेनं बाळाची हत्या केल्यानंतर बाळाचा मृतदेह एका काळ्या बॅगेत भरला होता. बॅगेत दोन मोठे दगड ठेवून तिने ही बॅग जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिली. पोलिसांनी ही बॅग विहिरीतून बाहेर काढली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपी आईलाही अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'चांगला नवरा करायचाय', दुसऱ्या लग्नासाठी विवाहितेकडून पोटच्या बाळाची हत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement