NMACC: नीता अंबानी यांचा रॉयल लूक! सिल्क साडी आणि दागिन्यांनी वेधलं लक्ष
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एनएमएसीसीच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात सलमान खान रणबीर सिंहसह अनेक स्टार्सची हजेरी, नीता अंबानींचा सिल्क साडीतील रॉयल लूक सर्वाधिक चर्चेत
NMACC च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बॉलीवूडचे दिग्गज सितारे अवतरले होते. सलमान खान, रणबीर सिंह, शाहीद कपूरपासून ते सिद्धार्थ-कियारापर्यंत अनेकांनी हजेरी लावली. मात्र, या सगळ्या तारांगणात यजमान नीता अंबानी यांचा लूक सर्वात जास्त चर्चेत राहिला. पारंपारिक भारतीय संस्कृती आणि आधुनिक फॅशनचा सुरेख संगम त्यांच्या या खास लूकधून पाहायला मिळाला.
सिल्क साडीचा शाही थाट
नीता अंबानी यांनी या खास संध्याकाळसाठी सोनेरी आणि गडद Crimson रंगाची एक अतिशय सुंदर सिल्क साडी परिधान केली होती. या साडीवरील नाजूक जरीकाम आणि कापडाची चमक यामुळे त्यांना एक 'रिच' आणि प्रभावशाली लूक मिळत होता. साडीचा पदर अत्यंत Structured Draping घेतल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच ग्रेस जाणवत होती.
advertisement
'पॅसली' डिझाइन आणि मॅरून ब्लाऊज
या साडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा रुंद बॉर्डर, ज्यावर पारंपारिक पॅसली डिझाइन कोरलेले होते. या साडीवर त्यांनी मॅरून-गोल्ड शेडचा ब्लाऊज मॅच केला होता. शॉर्ट स्लीव्हज आणि फिटेड स्ट्रक्चर असलेला हा ब्लाऊज साडीच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता.
advertisement
दागिन्यांची चर्चा
दागिन्यांच्या बाबतीत नीता अंबानी यांनी नेहमीप्रमाणेच 'ग्रँड' स्टाईल निवडली होती. त्यांनी परिधान केलेला लेयर्ड गोल्ड नेकलेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या नेकलेसमध्ये Emerald आणि माणिक जडलेले होते. यासोबतच मॅचिंग झुमके, सोन्याच्या बांगड्या आणि हातातील मोठी अंगठी यामुळे त्यांचा हा 'रॉयल लूक' पूर्ण झाला.
गजरा आणि सिम्पल मेकअप
advertisement
इतका जड पेहराव आणि दागिने असताना नीता अंबानी यांनी आपला मेकअप आणि हेअरस्टाईल मात्र अतिशय सोपी (Minimal) ठेवली होती. मध्यभागी भांग पाडून लो-बन बांधला होता आणि त्यावर पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याचा गजरा माळला होता. डोळ्यांना काजळ, हलका ब्लश आणि न्यूड लिपस्टिक अशा नॅचरल मेकअपमुळे त्यांचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 1:37 PM IST








