advertisement

Panvel Shocking Theft : तब्बल 22 तोळे सोने चोरीला, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् शेजारणीला 'ती' चूक भोवली!

Last Updated:

Panvel Crime News : पनवेलच्या कामोठेमधून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आलेली आहे. जिथे शेजारच्या महिलेनेच घरात चोरी केलेली आहे. नेमका पोलिसांनी तपास कसा केला आणि महिला पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली ते सविस्तर जाणून घेऊयात.

News18
News18
पनवेल : भारतात घरातल्या नातेवाईकापैंकी शेजारचे जवळेच मानले जातात. अनेकदा तर आपल्यापैंकी अनेकजण शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून बाहेर जात असतो. मात्र पनवेलच्या कामोठेमध्ये शेजाऱ्यांनी जे काही केलं ते पाहून सर्वांची पायाखालची जमिन सरकली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,पनवेलच्या कामोठे सेक्टर 35मध्ये एका सोसायटीतील एका घरात चोरी झाली होती. त्या चोरीत तब्बल 22 तोळे सोन्याचे दागिने लंपास झाले होते. या चोरी चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात अखेर या चोरीमागे ज्या घरात चोरी झाली त्या कुटुंबाच्या जवळची आणि रोजच्या भेटीगाठी असलेली शेजारीणच असल्याचे उघड झाले आहे.
advertisement
या घटनेने सोसायटीतील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे असून कामोठे पोलिसांनी याप्रकरणी सोसायटीतच राहणाऱ्या एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांची चक्रावणारी कामगिरी
27 सप्टेंबर रोजी कामोठे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला महिनाभर तपासात कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली शिवाय कोणावरही संशय आला नव्हता.मात्र, काही दिवसांनतर या तपासातील अधिकारी बदलले आणि गुन्ह्याच्या तपासाने वेग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने अत्यंत बारकाईने तपास सुरू केला.
advertisement
पोलिसांनी संशयित आरोपी महिलेवर लक्ष केंद्रित केले. केवळ तांत्रिक तपासच नव्हे तर त्या महिलेच्या बँक खात्यातील व्यवहारांचाही पोलिसांनी कसून मागोवा घेतला. चौकशीदरम्यान महिलेने दिलेल्या माहितीत आणि सत्य परिस्थितीचा पोलिसांना संशय आला. सोन्याचा मागोवा घेत पोलीस थेट मुंबईपर्यंत पोहोचले आणि या चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा छडा लावला.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ ताब्यात घेतले आणि तिच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण 22 तोळे सोने घेतले.या आरोपी महिलेला पनवेल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel Shocking Theft : तब्बल 22 तोळे सोने चोरीला, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् शेजारणीला 'ती' चूक भोवली!
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement