Mumbai Metro : मुहूर्त ठरला! मुंबई मेट्रो 9 अन् 2 ब 'या' दिवशी धावणार; वाहतूक कोंडीतून होणार सुटका
Last Updated:
Mumbai Latest Marathi News : मुंबई शहरात सध्या अनेक मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असून सध्या त्यातील दोन मेट्रो मार्गिका सुरु होण्याची शक्यत आहे. या मेट्रोचे उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ शकते.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच मेट्रो 9 आणि मेट्रो 2 ब या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या घ्या कधीपासून नागरिकांना यातून प्रवास करता येणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
मेट्रो 9 ही दहिसर ते गुंदवली या मेट्रो 7 मार्गिकेचा उत्तर टोकाकडील विस्तार आहे. या मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले होते. मात्र सीएमआरएसचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे उद्घाटन लांबले होते. आता हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
तसेच अंधेरी पश्चिम ते मंडाळे या मेट्रो 2 ब मार्गिकेच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या 5.53 किमीच्या पहिल्या टप्प्यालाही प्रमाणपत्र मिळाले आहे. मेट्रो 9 चा पहिला टप्पा 4.4 किमी लांबीचा आहे. या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यास पूर्व उपनगरातील नागरिकांना पहिल्यांदाच मेट्रोची सुविधा मिळणार आहे. गुंदवली ते काशिगाव असा थेट प्रवास शक्य होईल.
advertisement
पॉडटॅक्सी प्रकल्पाला लवकरच हिरवा कंदील?
याशिवाय वांद्रे ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉडटॅक्सी प्रकल्पाचेही भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. बीकेसी परिसरात दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 1:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मुहूर्त ठरला! मुंबई मेट्रो 9 अन् 2 ब 'या' दिवशी धावणार; वाहतूक कोंडीतून होणार सुटका










