शेवटची रिव्हिजन सुरू होती परीक्षा केंद्र गाठण्याआधीच बाप-लेकीचा करुण अंत, अख्खं गाव हळहळलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूरच्या मोहपा रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत तन्वी आणि तिचे वडील सुभाष केशव भिवणकर यांचा मृत्यू झाला. परीक्षेला जाताना घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हळहळला.
उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर: हातात पेन, मनात परीक्षेची धाकधूक आणि डोळ्यांत भविष्याची स्वप्ने घेऊन तन्वी घराबाहेर पडली होती. बाबांच्या मागे बाईकवर बसून कदाचित ती शेवटची एखादी 'रिव्हिजन' करत असेल किंवा वडील तिला "पेपर सोपा जाईल, काळजी नको करू" म्हणून धीर देत असतील. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.
advertisement
advertisement
advertisement
बारावीच्या बोर्ड परीक्षेला निघालेल्या बाप लेकीचा मृत्यू झाला. मोहपा गावातील सुभाष केशव भिवणकर आपल्या लाडक्या लेकीला, तन्वीला तिच्या करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर साथ देण्यासाठी स्वतः दुचाकीवरून उमरेडमधील केंद्रावर सोडायला निघाले होते. सोबत तिची मैत्रीण वंशिकाही होती. सकाळी १०:३० ची वेळ, रस्त्यावर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लगबग होती.
advertisement
advertisement
ज्या वयात तन्वीने यशाची शिखरे सर करायची होती, त्या वयात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढवली. घटनास्थळी विखुरलेली पुस्तके आणि रक्ताने माखलेले हॉल तिकीट पाहून उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. अपघाताची बातमी मोहपा गावात पोहोचताच संपूर्ण गाव सुन्न झाले. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते.
advertisement
advertisement
advertisement







