advertisement

Mumbai News: मुंबईत माणुसकी हरपली! रस्त्याच्याकडेला फेकला निष्पाप जीव; नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Last Updated:

सांताक्रूझमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका तरूणीने रस्त्याच्या कडेला मृत नवजात बालकाला टाकून दिल्याची घटना घडली आहे.

santacruz east shocking case dead newborn abandoned mumbai
santacruz east shocking case dead newborn abandoned mumbai
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सांताक्रूझमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सांताक्रूझ पूर्वमध्ये एका तरूणीने रस्त्याच्या कडेला मृत नवजात बालकाला टाकून दिल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या नवजात बालकाला टाकून जाणाऱ्याविरोधामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला मृत नवजात बालकाला टाकून जाणाऱ्या 22 वर्षीय तरूणीविरोधामध्ये वाकोला पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
तरूणीला पोलि‍सांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी नवजात बालकाला रूग्णालयात नेले होते. परंतू डॉक्टरांनी नवजात बालकाला मृत घोषित केले. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.15 वाजता यशवंत नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एका नवजात बालकाला टाकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी, फॉरेन्सिक पथक आणि दोन पंच साक्षीदारांसह घटनास्थळी पोहोचले. नवजात बालकाला सांताक्रूझ पूर्वमधील व्ही. एन. देसाई रूग्णालयात हलविण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
advertisement
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी विलेपार्ले पश्चिममधील कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला. तिथे पोलिसांना बालकाच्या आईची ओळख पटवण्यात यश आले. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रीणीसह प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवून घेतले. पोलिसांना मिळालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये, 'आठ ते नऊ महिन्यांचा मृतजन्म झालेला गर्भ' असल्याचे नमूद करण्यात आले. पोलिसांकडून आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायत का? याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. परंतू घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईत माणुसकी हरपली! रस्त्याच्याकडेला फेकला निष्पाप जीव; नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement