advertisement

मुंबई हादरली! 22 वार करत शरीराची केली चाळण, प्रोफेसरच्या हत्येनंतर भांडुपमध्ये तरुणाचा अमानुष खून

Last Updated:

मालाडमधील प्रोफेसरच्या हत्येची घटना ताजी असतानाच, आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.

News18
News18
मागील २४ तासांत मुंबईत हत्येची दुसरी धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकावर ओंकार शिंदे नावाच्या एका तरुणाने अलोक सिंग नावाच्या प्रोफेसरची निर्घृण हत्या केली. लोकल ट्रेनमधून प्रवास करताना झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मालाडमधील प्रोफेसरच्या हत्येची ही घटना ताजी असतानाच, आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकी घटना काय?

भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली नावाच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून झाल्याचे समजतं. हल्लेखोरांनी शंकरवर अत्यंत क्रूरपणे तब्बल २२ वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.
advertisement

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमांमुळे आणि अतिरक्तस्रावामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत. आरोपींची ओळख पटवली जात आहे. शंकरचे कोणासोबत वाद होते का? या दिशेने देखील पोलीस चौकशी करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई हादरली! 22 वार करत शरीराची केली चाळण, प्रोफेसरच्या हत्येनंतर भांडुपमध्ये तरुणाचा अमानुष खून
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement