Sharad Pawar : 'PM मोदींचे ते वक्तव्य क्लेशदायक' महिला आरक्षणावरुन शरद पवारांनी यादीच वाचून दाखवली

Last Updated:

Sharad Pawar : इतक्या वर्षात काँग्रेसने महिला आरक्षणासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी राजस्थान येथे बोलताना केली होती. यावर शरद पवार यांनी पुरावे देत पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
मुंबई, 26 सप्टेंबर (प्रणाली कापसे, प्रतिनिधी) : "महिलांचे सक्षमीकरण करण्याचा काँग्रेसचा हेतू कधीच नव्हता, काँग्रेसला हे काम तीस वर्षांपूर्वी करता आले असते. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे, असे काँग्रेसला कधीच वाटत नव्हते, हे सत्य आहे. तुम्ही तुमच्या मनापासून नाही तर सर्व महिलांच्या दबावामुळे विधेयकाच्या समर्थनार्थ आला आहात, अशी टीका पंतप्रधान मोंदी यांनी काल (सोमवारी) राजस्थानमध्ये बोलताना केली होती. या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. यावेळी महिलांसाठी काय केलं? याची यादीच पवारांनी वाचून दाखवली. शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
पवार म्हणाले, की मला एक प्रश्न विचारायचा आहे की पंतप्रधानांनी एका ठिकाणी भाषण केले. घटनात्मक दुरूस्तीचा निर्णय एक मताने घेतला. या घटना दुरूस्तीत एसी एस्टी महिलांना जशी संधी आहे, तशी ती ओबीसी महिलांना सुद्धा दिली जावी. त्यात पंतप्रधानाचे हे वक्तव्य क्लेश दायक आहे. ते म्हणाले की इतक्या वर्षात कोणी हा विचार पण केला नाही. महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना हे झाले. 1993 ला 73 वी घटना दुरूस्ती झाली. त्याची अमलबजावणी सुरू झाली. के आर नारायण उपराष्ट्रपती असताना आम्ही संमेलन आयोजित केले होते. महिला धोरण आम्ही जाहीर केले होते. महिलांना आधी 30 टक्के मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण दिले. हे आम्ही निर्णय घेतले होते. आणि पंतप्रधान म्हणतात की कुणी विचार ही केला नाही, असा पलटवार पवार यांनी केला.
advertisement
ते पुढे म्हणाले की मी संरक्षण मंत्री असताना महिलांसाठी 18 टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. तेव्हापासून परेडचे नेतृत्व महिला करतात. महिलांना एअरफोर्समध्ये घेण्याचा निर्णय संरक्षण मंत्री असताना घेतला होता. तेव्हा महिलांना कुणी सैन्यात घ्यायला तयार नव्हते. महिलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये घेतले जावे यासाठी बैठक झाली. तेव्हा सगळ्यांनी नाही सांगितले. चौथ्या बैठकीत मी सांगितले मंत्री म्हणून माझा अधिकार आहे. मी निर्णय घेतो. नो मोर डिक्शसन. हे सगळे निर्णय काँग्रेस काळात झाले. दुर्दैवाने पंतप्रधानांना कुणी सांगितले नाही, असा टोलाही पवारांनी मोदी यांना लगावला आहे.
advertisement
कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांवर 40 टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. आज संध्याकाळी पुन्हा बैठक होणार आहे तेव्हा माझा आग्रह आहे की 40 टक्के एक्सपोर्ट ड्युटी मागे ध्यावी. मला 100 टक्के असे वाटते की जागतिक बाजारात भारताची प्रतिमा बदलत आहेत. मी अहमदाबादला गेलो होते ते खरे आहे. तिथे एका शेतकऱ्याने एक उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या उद्घाटनासाठी मी गेले होतो. त्या व्यक्तीने चिकापासुन एक असे उत्पादन सुरू केले आहे की जे सकाळी दोन थेंब घेतले तर रोग प्रतिकारक शक्ती वाढले. असे उद्योग होत असेल तर मी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाईन. माझा भारत सरकारला आधी पाठिंबा राहील. 100 टक्के खोटे आहे. तिथे जे मुख्यमंत्री आहेत, त्या सरकारला पाठिंबा द्या असे मी म्हटले होते. सरकारमध्ये जा म्हटले नव्हते.
मराठी बातम्या/मुंबई/
Sharad Pawar : 'PM मोदींचे ते वक्तव्य क्लेशदायक' महिला आरक्षणावरुन शरद पवारांनी यादीच वाचून दाखवली
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement