'राम मंदिर सोहळा आनंदाचा क्षण पण..'; संजय राऊतांनी पुन्हा भाजपला सुनावलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई, वैभव सोनवणे : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव कधी देणार? नवीन वर्षात हे सरकार काय घेऊन येणार? असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी राम मंदिर सोहळ्यावरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी राम मदिराच्या सोहळ्यावरून पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. राम मंदिर सोहळा आनंदाचा क्षण आहे. हा देशाचा सोहळा पाहिजे, मात्र हा तर भाजपचा सोहळा झाला आहे. भाजप ने राम मंदिर सोहळा राजकीय केला. अक्षदा वाटण्यात येत आहेत की जणू तो एक लग्न सोहळा आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेनं बलिदान दिलं, त्याला आम्हाला कुठंही गालबोट लावायचं नाही. पण आम्ही योग्यवेळी बोलू असं राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
ते पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव कधी देणार? नवीन वर्षात हे सरकार काय घेऊन येणार? महाराष्ट्रामधून 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत. मुंबईची वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे, आमच्या मराठी लोकांच्या तोंडचा घास हे पळून लावत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2023 11:26 AM IST