Shocking : बाप फोन करत राहिला,पण मित्रानंच घात केला, 'त्या' घरातून वास आला..., मुंबईत क्रूरतेचा कळस
Last Updated:
Mumbai News : मुंबई शहरातून मैत्रिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. एका अत्यंत लहान कारणावरुन मित्रानेच मित्रासोबत जे केलं त्याने प्रत्येकजण हादरुन गेलेला आहे.
मुंबई : जगातील सर्वात आपुलकीचं नातं म्हणजे मैत्री. अनेकदा रक्ताच्या नात्यांपेक्षाही तिला अधिक मान आणि महत्त्व दिलं जातं. जीवनात असे अनेक प्रसंग घडतात त्यात मैत्री किती महत्त्वाची आहे ते दिसून येते. मात्र मुंबईत घडलेली घटना या सर्वाला चुकीची ठरवते. ज्यात मैत्रिणीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे.
रणजीतच्या वडिलांची ती आर्त हाक अन्
पैशांच्या वादातून 32 वर्षीय रणजीत चौधरी याची त्याच्याच मित्राने हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपी विक्की चौधरीला अटक केली.
त्या दिवशी नक्की काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,5 फेब्रुवारी रोजी रणजीत आणि विक्की यांच्यात पैशांवरून जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की त्याच रात्री विक्कीने रणजीतवर एका हत्याराने हल्ला करून त्याची हत्या केली.
advertisement
घाबरलेला असलेल्या विक्कीने 6 फेब्रुवारीच्या सकाळी बॅग घेऊन घराबाहेर पळ काढला. मात्र रणजीची चौकशी करण्यासाठी आणि त्याच्याकडे मोबाईल नसल्याने त्याचे वडील विक्कीला वारंवार फोन करून त्याची चौकशी करत होते. मात्र विक्कीने रणजीतबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
दुर्गंधी सुटल्यावर बंद खोलीचं रहस्य उघड
दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी घरातून दुर्गंधी पसरली त्यामुळे शेजाऱ्यांनी तातडीने याबद्दलची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडून पाहिले मात्र पोलिसांना समोर रणजीतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या.
advertisement
हत्येची मिस्ट्री अवघ्या 48 तासांत उलगडली
घटना स्थळावरुन जाऊन आल्यानंतर पोलिसांना तातडीने तपासाला वेग लावला आणि अवघ्या 48 तासांतच पोलिसांनी विक्की चौधरीला सांताक्रूजमधील कलिना परिसरातून अटक केली. मात्र हत्येसाठी वापरलेले शस्त्र शोधण्याचे काम सुरू आहे. रणजीत गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होता आणि पेंटर म्हणून काम करत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : बाप फोन करत राहिला,पण मित्रानंच घात केला, 'त्या' घरातून वास आला..., मुंबईत क्रूरतेचा कळस







