Navi Mumbai : कपड्याचं माप देण्यासाठी गेली अन् घडला हादरवणारा प्रकार; नवी मुंबईतील टेलर प्रकरणाने सर्वत्र खळबळ
Last Updated:
Navi Mumbai : नवी मुंबईतून एक संतापजनक शिवाय तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे नेमकं काय घडलं आणि कोणत्या व्यक्तीसोबत घडलं ते जाणून घ्या
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कपड्याचे माप घेण्यासाठी टेलरकडे गेलेल्या या अल्पवयीन मुलीसोबत हा संतापजनक प्रकार घडला.
टेलरकडे गेलेल्या मुलीसोबत घडलं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी बुधवार, 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वाशी परिसरातील एका टेलरच्या दुकानात नवीन कपड्यांसाठी माप देण्यासाठी गेली होती. माप घेण्याच्या बहाण्याने 46 वर्षीय टेलरने तिच्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घडलेल्या प्रकारानंतर मुलीने लगेच घरी जाऊन पालकांना माहिती दिली. या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तत्काळ वाशी पोलीस ठाणे गाठून आरोपी टेलरविरोधात तक्रार दाखल केली.
advertisement
या तक्रारीच्या आधारावर वाशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित टेलरविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलेला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 8:44 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : कपड्याचं माप देण्यासाठी गेली अन् घडला हादरवणारा प्रकार; नवी मुंबईतील टेलर प्रकरणाने सर्वत्र खळबळ











