advertisement

Vande Bharat: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप कुठून आला? CCTV मध्ये दिसला भंयकर प्रकार, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated:

Vande Bharat Express: रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफ'च्या माध्यमातून तपास सुरू केला. कोचमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गंभीर प्रकार समोर आला.

vande bharat -वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप कुठून आला? CCTV मध्ये दिसला भंयकर प्रकार, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
vande bharat -वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप कुठून आला? CCTV मध्ये दिसला भंयकर प्रकार, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
सोलापूर: सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप आढळ्याने मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वंदे भारतमध्ये साप सोडून प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आलंय. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई केली अशून जगन अर्जुन भाले (वय 37 राहणार मुंब्रा) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
27 डिसेंबर 2025 रोजी गाडी क्रमांक 22225 सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-16 (C-16) कोचमधील शौचालयात अचानक साप दिसून आला होता. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ते शौचालय बंद केले आणि सोलापूर स्थानकावर सर्पमित्राच्या मदतीने सापाला सुरक्षित बाहेर काढले. या विचित्र घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
advertisement
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफच्या माध्यमातून तपास सुरू केला. कोचमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका संशयित व्यक्तीने मुद्दाम पिशवीतून साप आणून शौचालयात सोडल्याचे स्पष्ट झाले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर पथकाने सापळा रचून 12 फेब्रुवारी 2026 रोजी मुंब्रा येथून जगन भाले याला ताब्यात घेतले.
advertisement
आरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 (ब), 147 आणि 153 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून रेल्वेने दिला आहे. आरपीएफच्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Bharat: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप कुठून आला? CCTV मध्ये दिसला भंयकर प्रकार, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement