BMC Election : निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी घोसाळकर भावूक, पतीसोबतचा फोटो शेअर करत...
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना तिकडे तेजस्वी घोसाळकर यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.
Tajasvee Ghosalkar : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दहीसरच्या वॉर्ड न.2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने धनश्री कोलगे यांना उमेदवारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे या दोघी मैत्रिणी आहेत.त्यामुळे दोन्ही मैत्रिणींमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.दरम्यान आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना तिकडे तेजस्वी घोसाळकर यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.
भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.या पोस्टमध्ये तेजस्वी घोसाळकर मुलीला उद्देशुन लिहतात, प्रिय यशवी, वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिये. मला माहित आहे की सार्वजनिक सेवेतील माझे जीवन म्हणजे घरी कमी वेळ आणि तुमच्यापासून जास्त वेळ दूर राहणे. मला माहित आहे की ते नेहमीच सोपे नसते.पण मला हे देखील माहित आहे की तुमच्या हृदयात एक जागा आहे जी कधीही भरून काढता येत नाही. मी दररोज, माझ्या स्वतःच्या छोट्या छोट्या मार्गांनी, तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याचा आणि तुमच्या वडिलांनी सोडलेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करते आहे.पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत असतील आणि तुमचे मार्गदर्शन आणि संरक्षण करतील.
advertisement
तेजस्वी घोसाळकर पुढे लिहतात,तुमच्या संयमाबद्दल आणि तुमच्या समजुतीबद्दल धन्यवाद. पालक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून, पुढे जात राहण्याचे आणि चांगले काम करण्याचे तुम्ही माझे सर्वात मोठे कारण आहात. मी आजूबाजूला नसतानाही, तुमच्यावरील माझे प्रेम नेहमीच तुमच्यासोबत असते.मी तुम्हाला माझा अधिक वेळ आणि माझे हृदय देण्याचा प्रयत्न करत राहण्याचे वचन देते. आणि मला तुझा नेहमीच अभिमान आहे,असे तेजस्वी घोसाळकर त्यांच्या पोस्टमधून सांगत आहे.
advertisement
Dear Yashvi,
Happy Birthday, my love. I know my life in public service often means less time at home and more time away from you. I know that isn’t always easy.
I also know there is a space in your heart that can never truly be filled. I try every day, in my own small ways, to… pic.twitter.com/eSajeVhyW9
— Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) January 1, 2026
advertisement
तेजस्वी घोसाळकर यांच्या लेकीचा 1 जानेवारी 2026 ला वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची प्रचंड चर्चा आहे.
दरम्यान तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. यानंतर तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर (विनोद घोसाळकर यांचा मुलगा) यांचा फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळवण्यासाठी तेजस्वी घोसाळकर या प्रयत्न करत आहेत. तसेच घोसाळकर कुटुंबियांवर झालेला अन्याय पाहून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून तेजस्वी घोसाळकरला पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता होती. पण ऐनवेळी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंना तेजस्वी घोसाळकर यांच्यासमोर एक तगडा उमेदवार उभं करण्याचं आव्हान होतं. या आव्हानाला स्वीकारत उद्धव ठाकरे धनश्री कोलगेला उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे या दोघी मैत्रिणी आहेत.त्यामुळे दोन्ही मैत्रिणी निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 6:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election : निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी घोसाळकर भावूक, पतीसोबतचा फोटो शेअर करत...










