Raj Thackeray: 'तळपायाची आग मस्तकात गेली..' राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संतापले, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.'
मुंबई: महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषदेची निवडणूक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. पण, या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतापले आहे. 'निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.' अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
राज्यात ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने मतदार याद्यांमध्ये कशा प्रकार बोगस मतदार आहे, हे पुराव्यानिशी समोर आलं. अलीकडे मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी पत्रकारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदार याद्यांबद्दल प्रश्व विचारले असला गोलमाल उत्तरं दिली. या प्रकारावर राज ठाकरेंनी ट्वीट करून संताप व्यक्त केला.
advertisement
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
advertisement
"आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
advertisement
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पाहावी.. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, असंही राज ठाकरे म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 6:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Raj Thackeray: 'तळपायाची आग मस्तकात गेली..' राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संतापले, VIDEO


