Mumbai VBA List: मुंबई महानगरपालिकेसाठी वंचित पहिली यादी जाहीर, महायुतीविरोधात उतरवले तगडे उमेदवार

Last Updated:

मुंबईत वंचित बहुजन आघाडी एकूण ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केली आहे

News18
News18
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका  निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांनी मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडी एकूण ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केली आहे
मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडे देण्यात आलेल्या ६२ जागांमध्ये वॉर्ड क्र. ६, ११, १२, ८४, ९५, १२७, १५३ आणि २२५ यांसारख्या विविध महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. आज वंचितने जाहीर केलेल्या पहिला यादीत एकूण १० उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. जाहीर केलेले उमेदवार हे मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारांचा समावश आहे.
advertisement
वंचितने आज वॉर्ड क्रमांक 54, 160, 169, 114, 114, 118, 119, 127, 146, 155,173या वॉर्डचा समावेश आहे.

वंचितची यादी

उमेदवाराचे नाववार्ड क्रमांकजिल्हा
राहुल ठोके५४मुंबई उत्तर पश्चिम
गौतम हराल१६०उत्तर मध्य मुंबई
स्वप्नील जवळगेकर१६९उत्तर मध्य मुंबई
सीमा इंगळे११४ईशान्य मुंबई
सुनीता वीर११८ईशान्य मुंबई
चेतन अहिरे११९ईशान्य मुंबई
वर्षा थोरात१२७ईशान्य मुंबई
सतीश राजगुरू१४६दक्षिण मध्य मुंबई
ज्योती वाघमारे१५५ दक्षिण मध्य मुंबई
सुगंधा सोंडे१७३ दक्षिण मध्य मुंबई
advertisement
तर दुसरीककडे रासप महादेव जानकर यांच्या पक्षाची पहीली यादी जाहीर केली आहे.  रासपचे ६ उमेदवार मुंबईतून लढणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांची यादी

उमेदवाराचे नाववॉर्ड क्रमांक
आदित्य यादव४०
संजय घरत१०६
सविता उत्तेकर१०९
प्रतिक्षा जाधव१३३
वनीता नन्नावरे१४२
तुषार आंब्रेकर२२६
advertisement
काँग्रेस आणि वंचितच्या या युतीमुळे मुंबईत दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारे विभाजन या युतीमुळे थांबण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा काँग्रेस-वंचितला होऊ शकतो. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक वापरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या युतीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai VBA List: मुंबई महानगरपालिकेसाठी वंचित पहिली यादी जाहीर, महायुतीविरोधात उतरवले तगडे उमेदवार
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement