advertisement

Vande Local: वंदे भारतनंतर आता वंदे लोकल धावणार, कोणत्या मार्गावरील प्रवाशांना मिळणार रेल्वेचं गिफ्ट

Last Updated:

व्यावसायिक दृष्टीने पाहिल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आता वंदे लोकल धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता वंदे लोकल या मार्गावर धावणार आहे. गुजरातपासून कोणत्या ठिकाणापर्यंत ही लोकल धावेल, जाणून घेऊया...

News18
News18
मुंबई: मुंबई महानगर प्रदेशाची उत्तरेकडे होत असलेली झपाट्याने वाढ आणि दक्षिण गुजरातमधील वाढता औद्योगिक रोजगार प्रवास पाहता भविष्यात मुंबई ते गुजरात दरम्यान सबर्बन लोकल सेवा सुरू करण्याच्या चर्चेला सुरत रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पामुळे नवे बळ मिळत आहे. सुरू असलेल्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पात दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म उभारले जात असल्याने भविष्यात मुंबई आणि गुजरात हे उपनगरीय रेल्वे नेटवर्कद्वारे जोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म ?
  • या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्मची उभारणी.
  • सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची मर्यादा विरार आणि डहाणूपर्यंत असली तरी त्यापुढे वापी, वलसाड, नवसारी आणि सुरतपर्यंत मोठ्या प्रमाणावर दैनंदिन प्रवासी प्रवास करत आहेत.
  • सुरतचा डायमंड उद्योग, टेक्सटाईल मार्केट, वापी- वलसाड औद्योगिक पट्टा तसेच मुंबईतील सेवा क्षेत्र यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे.
advertisement
विरार-सुरत नमो भारत आणि वंदे मेट्रो
  • सध्या या मार्गावर मेमू आणि डेमू प्रकारातील काही गाड्या धावत असल्या तरी पूर्ण विकसित सबर्बन नेटवर्कसारखी वारंवार सेवा उपलब्ध नाही.
  • याच पार्श्वभूमीवर सुरत स्टेशनवर उभारले जाणारे स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म हे भविष्यातील रेल्वेचे नियोजनात 200 ते 300 किमी अंतरासाठी नमो भारत आणि वंदे मेट्रोसारख्या जलद शहरी रेल्वे सेवांवर भर दिला जात आहे.
  • त्यानुसार विरार ते सुरत दरम्यान अशा आधुनिक सबर्बन सेवा सुरू होण्याची योजना आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Local: वंदे भारतनंतर आता वंदे लोकल धावणार, कोणत्या मार्गावरील प्रवाशांना मिळणार रेल्वेचं गिफ्ट
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement