आता तिकीट मिळेल एका मिनिटात! पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, बसवणार 150 नवीन एटीव्हीएम मशीन!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पश्चिम रेल्वेवरील उपनगरी प्रवाशांची वाढती गर्दी आणि तिकीट काढण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील उपनगरी प्रवाशांची वाढती गर्दी आणि तिकीट काढण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (एटीव्हीएम) आणि साहाय्यकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. अधिकृत माहितीनुसार पश्चिम रेल्वेवर लवकरच 280 नवीन एटीव्हीएम बसविण्याची योजना असून, त्यापैकी 150 मशिन फेब्रुवारी महिन्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.
सध्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात चर्चगेट ते डहाणूपर्यंत एकूण 384 एटीव्हीएम कार्यरत आहेत. मात्र, प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अनेक स्थानकांवर ही यंत्रणा अपुरी ठरत आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांत उपनगरी रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएमची संख्या लक्षणीयरीत्या वाढविण्यात येणार आहे. उर्वरित 130 मशिन्सचा प्रस्ताव पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
रेल्वे बोर्डाच्या 2013 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार किमान 50 टक्के एटीव्हीएम प्रवाशांच्या स्वतःच्या वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात चर्चगेट ते विरारदरम्यान एटीव्हीएमच्या माध्यमातून 60 लाखांहून अधिक तिकीट विक्री झाली असून ही सुविधा प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र आहे.
advertisement
एटीव्हीएमवर तिकीट काढण्यासाठी साधारण दोन मिनिटांचा वेळ लागतो. काही वेळा नवख्या प्रवाशांमुळे गर्दी वाढते. ही अडचण दूर करण्यासाठी आतापर्यंत 184 साहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गरज भासल्यास भविष्यात त्यांच्या संख्येत वाढ केली जाईल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आता तिकीट मिळेल एका मिनिटात! पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, बसवणार 150 नवीन एटीव्हीएम मशीन!










