Mumbai Crime : बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक

Last Updated:

बुरख्याच्या आत काय आहे? या एका प्रश्नाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एकच खळबळ माजली. विमानतळावरच्या सुरक्षा यंत्रणांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक (Grok AI Image)
बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक (Grok AI Image)
मुंबई : बुरख्याच्या आत काय आहे? या एका प्रश्नाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एकच खळबळ माजली. विमानतळावरच्या सुरक्षा यंत्रणांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. ज्यानंतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. बुरख्याच्या आत असणाऱ्या गोष्टीचं सत्य जाणून घेण्यासाठी आता डीआरआयचे ऑफिसर ऍक्शनमध्ये आले आहेत.
मुंबई विमानतळावरच्या या प्रकरणात डीआरआयला केनियन टोळीबद्दलची एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर डीआरआयने मुंबई विमानतळावर सापळा रचला. शुक्रवारी नैरोबीहून मुंबई विमानतळावर आलेल्या चार महिलांकडे पाहून डीआरआयला संशय आला. या चारही महिला बुरख्यामध्ये असल्यामुळे डीआरआयच्या टीमने त्या कस्टमच्या ग्रीन चॅनलजवळ जाईपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

प्रश्न ऐकताच चेहऱ्याचा रंग उडाला

advertisement
कस्टमच्या ग्रीन चॅनलमध्ये पोहोचल्यानंतर चारही महिला मेटल डिटेक्टरमधून गेल्या, यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. यानंतर महिला अधिकाऱ्याने बुरख्याच्या आत काय आहे? असं विचारलं, तेव्हा चारही महिलांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. उत्तर देताना या चारही महिलांनी नकारार्थी मान हलवली.

कोट्यवधींचं सोनं जप्त

यानंतर चारही महिलांना इनव्हेस्टिगेशन रूममध्ये नेण्यात आलं आणि त्यांची तपासणी सुरू झाली. या महिल्यांच्या बुरख्याच्या आत सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या सोनं जवळपास 5.185 किलो असून याची किंमत जवळपास 4.14 कोटी रुपये आहे. तपासामध्ये या चारही महिला नैरोबीच्या असल्याचं समोर आलं आहे. कस्टमने या चारही परदेशी महिलांना अटक केली असून सोनंही जप्त केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement