advertisement

पुणेकरांनो, आता वीकेंडला बिनधास्त लोणावळ्याचा प्लॅन करता येणार; प्रवास होणार सुपरफास्ट, रेल्वेबाबत महत्त्वाची अपडेट

Last Updated:

पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Bengluru Mumbai Train: बेंगळुरू- मुंबई फक्त 18 तासांत! एक्सप्रेसचा वेग खरंच वाढणार का? अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट
Bengluru Mumbai Train: बेंगळुरू- मुंबई फक्त 18 तासांत! एक्सप्रेसचा वेग खरंच वाढणार का? अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट
पुणे: पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या मार्गावरील प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी पुणे येथे दिली.
नव्या मार्गिकांमुळे काय बदलणार?
लोकलच्या फेऱ्यांत मोठी वाढ: सध्या पुणे-लोणावळा दरम्यान केवळ दोनच मार्गिका असल्याने एक्सप्रेस आणि लोकल एकाच मार्गावरून धावतात. नव्या लाईन्समुळे लोकलसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल, ज्यामुळे दर १५-२० मिनिटांनी लोकल सोडणे शक्य होईल.
वेळेची मोठी बचत: एक्सप्रेस गाड्यांना रस्ता देण्यासाठी अनेकदा लोकल गाड्या आऊटरला थांबवून ठेवल्या जातात. नवीन मार्गिकांमुळे हा खोळंबा थांबेल आणि नोकरदार, विद्यार्थी तसेच पर्यटकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
advertisement
वेगवान प्रवास: दोन अतिरिक्त ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढवता येईल, ज्यामुळे पुणे ते लोणावळा हे अंतर सध्याच्या तुलनेत कमी वेळात कापता येईल.
एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुधारणार: लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या नवीन ट्रॅकचा फायदा मिळेल, ज्यामुळे गाड्या उशिराने धावण्याचे प्रमाण कमी होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटना या नवीन लाईन्सची मागणी करत आहेत. हा प्रकल्प राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या भागीदारीतून पूर्ण केला जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन हा सर्वात मोठा टप्पा होता, ज्यावर आता तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. या नवीन रेल्वे लाईन्स कार्यान्वित झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून, लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, आता वीकेंडला बिनधास्त लोणावळ्याचा प्लॅन करता येणार; प्रवास होणार सुपरफास्ट, रेल्वेबाबत महत्त्वाची अपडेट
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement