बारामती जिल्हा परिषद पंचायत समिती साठी एकूण 54.90% मतदानाची टक्केवारी झालेली आहे.. तर इंदापूर मध्ये 65. 67% मतदानाची टक्केवारी झाली आहे.. झालेल्या मतदानाच्या मतपेट्या आहेत ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत मतमोजणी बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे..
मागील वेळेस झालेल्या 34 जिल्हा परिषद (जिप) आणि त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या 351 पंचायत समित्यांच्या (पंस) निवडणुकांमध्ये राज्यातील तत्कालीन सत्ताधारी भाजपला विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कडवी टक्कर मिळाली होती. 2014 ते 2018 या कालावधीत 34 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना एकूणच समाधानकारक प्रतिसाद मिळाला. राज्यभरात सरासरी ७० टक्क्यांहून अधिक मतदान झालं. मात्र, पवार कुटुंबीयांचा राजकीय गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत यंदा वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी केवळ ५४.९० टक्के मतदान झालं. पुणे जिल्ह्यात हा आकडा सर्वांत कमी ठरला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला. प्रचाराच्या दरम्यानच २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली होती.
बारामतीत सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती करिता आज मतमोजणी होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे



