advertisement

Panvel : लग्नातील निरोप शेवटचा ठरला, घरी पोहोचण्यापूर्वीच भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

Last Updated:

Panvel Accident News : पनवेलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. जिथे लग्नाहून परतत असताना एक महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

News18
News18
नवी मुंबई : कधी कोणत्या व्यक्तीची भेट शेवटची होईल ते सांगता येत नाही. सध्या अशीच एक मनाला चटका लावून देणारी घटना पनवेलमधून समोर आलेली आहे. जिथे घडलेल्या अपघातात 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
भोईर दांपत्यावर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहरात रविवारी दुपारी एका भीषण अपघातात 39 वर्षीय महिलेचा जागाची मृत्यू झालेला आहे. हा अपघात पनवेल-जेएनपीटी महामार्गावर घडलेला असून ज्यात एका ग्रीट पावडरने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेला आहे. या घडलेल्या दुर्घटनेत स्वप्ना भोईर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर त्यांचे पती मिथुन भोईर हे गंभीर जखमी झालेले आहेत.
advertisement
लग्नातील भेट ठरली शेवटची
मयत महिला स्वप्ना आणि त्याचे पती मिथुन भोईर हे दाम्पत्य न्हावा या गावात राहत होते. त्या दिवशी ते कर्जत येथे असलेल्या नातेवाइकांच्या लग्नसमारंभाला गेले होते. त्यानंतर लग्न समारंभ आटोल्यानंतर ते त्यांच्या दुचाकीवरुन घरी येण्यासाठी निघाले. मात्र भरदुपारी साधारण सव्वा तीनच्या सुमारास पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील गव्हाणफाटा येथे त्यांच्या दुचाकीला मागून येणार्‍या एका डंपरने धडक दिली
advertisement
या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक एवढी जोरदार होती की, स्वप्ना भोईर या दुचाकीवरून खाली पडून डंपरच्या मागील चाकाखाली गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली शिवाय स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमी मिथुन भोईर यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोईर कुटुंबावर शोककळा पसरली आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel : लग्नातील निरोप शेवटचा ठरला, घरी पोहोचण्यापूर्वीच भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement