सीमा हैदर करणार राजकारणात एन्ट्री? 'या' पक्षानं दिली ऑफर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
'इटलीहून येऊन सोनिया गांधी पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा राजकारणात का येऊ शकत नाही?', असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
नोएडा, 3 ऑगस्ट : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली 4 मुलांची आई आणि ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा गावात आपल्या पबजी प्रियकरासोबत संसार थाटणारी सीमा हैदर दहशतवादी आहे का? ती एका वेगळ्याच उद्देशाने भारतात आली आहे का? तिची कसून चौकशी करा. तिला सचिनच का आवडला? तिला पबजी खेळायला वेळच कसा मिळाला? तिला पाकिस्तानने तर पाठवलं नाहीये ना? सचिन केवळ एक मोहरा तर नाही ना? अशा सर्व संशयास्पद चर्चांनंतर आता सीमाच्या चक्क राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामागे कारणही तसंच आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी तिची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली. 'इटलीहून येऊन सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?', असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
advertisement
पुढे ते म्हणाले, 'सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते.' दरम्यान, किशोर मासूम यांच्या या वक्तव्यामुळे आधीच चर्चेत असलेलं सीमा प्रकरण आता आणखी चर्चेत आलं आहे.
advertisement
'सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत. त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवं', असंही किशोर मासूम म्हणाले. विशेष म्हणजे किशोर मासूम हे दयानतपूरचे रहिवासी आहेत. हे गाव राबुपुरापासून जवळच आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मोदींच्या NDA आघाडीत असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे केंद्रात दुसऱ्यांदा मंत्रीपदी विराजमान आहेत.
view commentsLocation :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
August 03, 2023 10:14 AM IST


