या शहरातील लोकांनी घराबाहेर जे लिहिलं ते पाहून बसेल धक्का, नेमका काय आहे प्रकार
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
कावड यात्री आणि मुस्लि समाजातील लोक समोरासमोर आले आहेत.
चितरंजन सिंह, प्रतिनिधी
बरेली, 2 जुलै : उत्तरप्रदेश राज्यातील बरेलीमध्ये कावड यात्रेदरम्यान झालेला वाद आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जची घटना अजूनही शांत झालेली नाही. कावड यात्रेकरुंवर झालेल्या लाठीचार्जनंतर बॅकफूटवर आलेल्या पोलिसांच्या बदलल्या वर्तणुकीला पाहता बरेली जिल्ह्यात बारादरी ठाणे क्षेत्रातील जोगी नवादामध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी घर विकणे आहे, असे पोस्टर्स लावले आहेत. कावड यात्रा काढण्याच्या विरोधात घर विकणे आहे, अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
advertisement
मुस्लिम समाजाच्या लोकांचे म्हणणे आहे की, ते आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात नाही टाकू इच्छित आहेत. रविवारी कावड यात्रेकरूंवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. लाठीचार्ज केल्यानंतर एसएसपी प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. तर बारादरी पोलीस ठाण्याचे प्रमुक आणि चौकी इंजार्ज यांना निलंबित करण्यात आले आहे.
नेमकी काय आहे संपूर्ण घटना -
बरेलीमध्ये कावड यात्री आणि मुस्लि समाजातील लोक समोरासमोर आले आहेत. याप्रकरमी तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी बारादरी पोलीस ठाणे क्षेत्राच्या नवादा येथे मोठा वाद झाला आहे. तिसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढण्यावरुन बरेलीमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी दगडफेक केली, यामध्ये अनेक कावड यात्री जखमी झाले होते. तेच दुसरीकडे सोमवारी जल घ्यायला कछला गंगा घाट जात असलेल्या कावड यात्रींची मागणी होती की, ते डीजे मुस्लिम परिसरातून घेऊन जातील. याचा विरोध मुस्लिम समाजातील लोकांनी केला आणि या निर्णयाच्या विरोधात प्रदर्शन केले.
advertisement
यादरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाच्या पथकाने कावडयात्री आणि मुस्लिम समाजातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, मुस्लिम समाजातील लोक हे डीजे वाजवला जाणार नाही, या बाबवर सहमत झाले. मात्र, तेच दुसरीकडे कावडयात्री डीजे वाजवून घेऊन जाण्यावर अडून राहिले. याठिकाणी मग दोन्ही गटांमध्ये वाद झाला. यानंतर बरेली पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्जही केला गेला.
advertisement
यानंतर याप्रकरणी एसएसपी प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली आणि बारादरी ठाणे इन्चार्ज आणि चौकी इन्चार्ज यांना निलंबित करण्यात आले. यानंतर आता मुस्लिम समाजातील लोकांनी याठिकाणी आपले घर विकणे आहे, अशा स्वरुपाचे पोस्टर्स लावले आहेत. आम्ही येणाऱ्या पिढ्यांना आपापसात नाही लढवू इच्छित त्यामुळे आम्ही आमचे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जात आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
August 02, 2023 10:24 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
या शहरातील लोकांनी घराबाहेर जे लिहिलं ते पाहून बसेल धक्का, नेमका काय आहे प्रकार


