मोठी बातमी! मुंबईहून लंडनला निघालेले Air India चं विमान माघारी बोलावलं, कारण काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं AI129 विमान तातडीने मुंबईत परत बोलावलं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला असून पीएम मोदी घटनास्थळी पाहणीसाठी जाणार आहेत.
अहमदाबाद एअर इंडियाचं बोइंग 787 विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. मुंबईहून लंडनला जाणारं विमान मुंबईत पुन्हा बोलवलं आहे. AI129 विमान टेकऑफनंतर काही वेळात मुंबईला बोलावलं. पहाटेच्या सुमारास हे विमान लंडनला निघालं होतं. मात्र त्यांना सूचना देऊन पुन्हा मुंबईत बोलवून घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या विमानाला इमर्जन्सी अलर्ट देऊन पुन्हा का बोलवलं याबाबत तूर्तास कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
Air India flight AIC129, which took off early morning today from Mumbai for London, is returning to Mumbai, according to Flightradar24. More details are awaited. pic.twitter.com/BmRtlkmaut
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2025
इराण इस्रायल संघर्षमय परिस्थितीमुळे सध्या काही विमानं डायवर्ट केली आहेत किंवा पुन्हा बोलवली जात आहेत. इराण-इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आणि आमच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेमुळे, एअर इंडियाच्या खालील उड्डाणे एकतर वळवली जात आहेत किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवली जात आहेत
advertisement
AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाकडे वळवली जात आहे
AI102 – न्यू यॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवली जात आहे
AI116 – न्यू यॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवली जात आहे
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवली जात आहे
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईकडे परतली जात आहे
AI119 – मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईकडे परतली जात आहे
advertisement
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीकडे परतली जात आहे
AI106 – नेवार्क-दिल्ली – दिल्लीकडे परतली जात आहे
AI188 – व्हँकूवर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवली जात आहे
AI101 – दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे परतली जात आहे
AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे परतली जात आहे
AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू - शारजाहला वळवली
AI2016 - लंडन हीथ्रो-दिल्ली - व्हिएन्नाकडे वळवली
advertisement
AI104 - वॉशिंग्टन-दिल्ली - व्हिएन्नाकडे वळवली
AI190 - टोरंटो-दिल्ली - फ्रँकफर्टला वळवली
AI189 - दिल्ली-टोरंटो - दिल्लीकडे परतली
बिघाड आहे की काही वेगळे कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. कदाचित सध्याच्या इस्रायल-इराण परिस्थितीमुळे देखील हा निर्णय घेतला असावा अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप तरी एअर इंडियाकडून कोणतंही कारण समोर आलेलं नाही. दुसरीकडे पीएम नरेंद्र मोदी गुजरातच्या अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमानाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 13, 2025 8:59 AM IST