advertisement

IAS कोचिंग सेंटरमध्ये पाणी घुसलं, UPSC करणाऱ्या तिघांचा मृत्यू; बायोमेट्रिक सिस्टिमने केला घात?

Last Updated:

राव कोचिंग सेंटरची लायब्ररी तळमजल्यावर आहे. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आत घुसला आणि अनेक विद्यार्थी अडकले.

News18
News18
दिल्ली : दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर परिसरात शनिवारी रात्री राव आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पुराचं पाणी शिरलं. यामुळे तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन विद्यार्थीनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलवावं लागलं. मात्र, त्यांनाही या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात अपयश आलं. शेवटी बाहेर मृतदेहच आले.
दिल्लीतील या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आयएएस कोचिंग सेंटरसह इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. हे कसं झालं? नेमकं काय घडलं? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी कसं भरलं आणि विद्यार्थी बाहेर का पडू शकले नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तीन जणांच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाईची मागणी केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, मुसळधार पाऊस पडत होता आणि रस्त्यावर पाणी भरलं होतं. क्लास संपल्यानंतर काही लोक सेंटरमध्येच अडकले.
advertisement
राव कोचिंग सेंटरची लायब्ररी तळमजल्यावर आहे. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आत घुसला आणि अनेक विद्यार्थी अडकले. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, कोचिंग सेंटरच्या एंट्री आणि एक्झिटच्या रेकॉर्डसाठी गेटवर बायोमेट्रिक सिस्टिम लावली होती. त्यातच पाणी शिरल्यानं ही सिस्टिम बंद झाली आणि विद्यार्थी आतच अडकले. तर काही लोकांनी पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं म्हटलंय.
advertisement
दिल्ली सेंट्रल झोनचे डीसीपी हर्षवर्धन यांनाही बायोमेट्रिक सिस्टिममुळे अडकले का असं विचारलं असता ते म्हणाले की, असं म्हणतायत पण हा तपासाचा विषय आहे. शवविच्छेदनानंतरच हे स्पष्ट होईल की पाण्यात बुडाल्याने की वीजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/देश/
IAS कोचिंग सेंटरमध्ये पाणी घुसलं, UPSC करणाऱ्या तिघांचा मृत्यू; बायोमेट्रिक सिस्टिमने केला घात?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement