सावधान! हिवाळ्यात शेकोटी करताना ही काळजी घ्या, अन्यथा जाऊ शकतो जीव

Last Updated:

डॉक्टरांचे म्हणणे आहे की बंद खोलीत कधीही शेकोटी पेटवू नये. कारण आगीमुळे बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साइड जीवघेणा ठरू शकतो.

फाईल फोटो
फाईल फोटो
विकाश कुमार, प्रतिनिधी
चित्रकूट, 21 डिसेंबर : देशातील अनेक भागात थंडी पडत आहे. उत्तरप्रदेशातील चित्रकूटमदध्येही कडाक्याची थंडी पडत आहेत. अशा परिस्थितीत देशातील विविध भागात थंड पडत असल्याच्या ठिकाणी लोक शेकोटी करतात. थंडी पासून बचाव करण्यासाठी अनेक जण शहरी आणि ग्रामीण भागातही शेकोटी करतात. मात्र, शेकोटी करताना थोडीशी चूक करणे जीवघेणे ठरू शकते.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की बंद खोलीत कधीही शेकोटी पेटवू नये. कारण आगीमुळे बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साइड जीवघेणा ठरू शकतो. आजही माहिती नसल्याने लोक बंद खोलीत शेकोटी पेटवून झोपताना कोणतीही खबरदारी घेत नाहीत. पण असे करणे त्यांच्यासाठी घातकही ठरू शकते.
advertisement
डॉक्टरांच्या मते, बंद खोलीत शेकोटीचा करणे धोक्याचे आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. यामुळे जाणीव पातळी कमी होऊन व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
सीएचसी माणिकपूरमध्ये तैनात असलेले डॉ. अजय यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, बागेत किंवा मोकळ्या जागेत शेकोटी पेटवली तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड तयार होत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. धोकादायक वायू जर तो मोकळ्या भागात गेला तर जास्त नुकसान होत नाही.
advertisement
पण आजकाल आळशीपणामुळे लोक आपल्या खोलीत शेकोटी करतात आणि झोपून जातात. यामुळे तो वायू बाहेर पडू शकत नाही आणि विषारी वायू बनून तुमच्या फुफ्फुसावर हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या/देश/
सावधान! हिवाळ्यात शेकोटी करताना ही काळजी घ्या, अन्यथा जाऊ शकतो जीव
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement