Indigo Fligh Emergency Landingt: PAN PAN PAN म्हणत पायलटने दिला मेसेज, मुंबईत आपत्कालीन लँडिंग! काय असतो याचा अर्थ?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो 6E 6271 विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईत इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आली. 191 प्रवासी सुरक्षित आहेत. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो 6E 6271 विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांनी जीव मुठीत धरला. काही मोठं घडण्याआधी पायलटने विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग मुंबई विमानतळावर केलं. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागलं. या विमानात एकूण 191 प्रवासी आणि क्रू मेंबर होते. सुदैवानं पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सगळे प्रवासी सुखरुप आणि सुरक्षित आहेत.
नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नियोजित वेळेनुसार रात्री 9:42 मिनिटांनी पोहोचणार होतं. मात्र, विमानाच्या उड्डाणादरम्यान एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं. पायलटने रात्री 9:25 मिनिटांनी 'पॅन-पॅन-पॅन' कॉल दिला. हा एक प्रकारचा इमरजन्सी संदेश असतो.
advertisement
त्यानंतर विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री 9:52 वाजता सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं. एअरबस A320 निओ सारख्या विमानांमध्ये दोन इंजिन्स असतात आणि हे विमान एका इंजिनवरही सुरक्षित उड्डाण आणि लँडिंग करू शकतं. याच तांत्रिक क्षमतेमुळे पायलटने प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतला आणि मोठी दुर्घटना टळली.
पॅन आणि मेडे यामधला फरक काय?
अनेकांना वाटतं की आपत्कालीन परिस्थितीत फक्त मेडे कॉलच दिला जातो, याचा अर्थ असा की काहीच हातात नाही, कोणतीही दुर्घटना होऊ शकते. तर पॅन पॅन पॅन ही एक वेगळी आणि कमी तीव्रतेचा इमरजन्सी कॉल आहे. याचा अर्थ असा की परिस्थिती बिकट आहे आम्हाला मदत करा मात्र कोणतीही जीवितहानी होण्याचा धोका कमी असतो. उदा. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, वैद्यकीय अडचण किंवा इतर अशा गोष्टींसाठी पॅन कॉल दिला जातो. दुसरीकडे, मेडे ही कॉल अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीत दिली जाते. जसे दोन्ही इंजिन फेल होणे, विमानाला आग लागणे किंवा तात्काळ लँडिंगची गरज भासणे. ‘मेडे’ ही कॉल सर्वोच्च पातळीची इमरजन्सी असते.
advertisement
इंडिगोचं काय म्हणणं आहे?
इंडिगो एअरलाईन्सने म्हटलं आहे की तांत्रिक बिघाडामुळे विमान डायव्हर्ट करण्यात आलं आणि सर्व सुरक्षा प्रक्रियेचं पालन करत ते मुंबईत उतरवण्यात आलं. पुढील उड्डाणापूर्वी या विमानाची तपासणी आणि देखभाल केली जाईल. पायलटच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. तर इंडिगोकडून विमानाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 7:57 AM IST
मराठी बातम्या/देश/
Indigo Fligh Emergency Landingt: PAN PAN PAN म्हणत पायलटने दिला मेसेज, मुंबईत आपत्कालीन लँडिंग! काय असतो याचा अर्थ?