advertisement

Gaza war: भारतीय निवृत्त कर्नल वैभव काळेंचा इस्रायल हल्ल्यात मृत्यू! इतिहासात पहिलीच घटना; जगभर खळबळ

Last Updated:

Gaza war: इस्रायल-गाझा संघर्षात संयुक्त राष्ट्राच्या जवानाला जीव गमवावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय निवृत्त कर्नल वैभव काळे
भारतीय निवृत्त कर्नल वैभव काळे
नवी दिल्ली : दक्षिण गाझामधील रफाह शहरातील खान युनिस परिसरात झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्राचा एक कर्मचारी ठार झाला तर दुसरा जखमी झाला. या कर्मचाऱ्याचं नाव अनिल वैभव काळे असून ते भारतीय लष्कराचे निवृत्त कर्मचारी होते. ज्यांनी 14 मे 2024 म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या सुमारे 2 महिने आधी गाझामध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून संयुक्त राष्ट्रांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली आहे. कारण, यूएनचा मधील कर्मचाऱ्याचा हा पहिलाच मृत्यू होता.
रफाह येथून खान युनिस भागातील हॉस्पिटलकडे जाताना संयुक्त राष्ट्राचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला हल्ला सक्रीय लढाऊ क्षेत्रामध्ये झाला असून इस्त्राईल संरक्षण दल (आयडीएफ) या घटनेची चौकशी करत असल्याचे वृत्त आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात अनिल काळे यांचा मृत्यू हा यूएनचा पहिला मृत्यू आहे. मृत्यूसमयी ते 46 वर्षांचे होते.
advertisement
युनायटेड नेशन्सचे प्रवक्ते फरहान हक यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, 46 वर्षीय वैभव अनिल काळे हे दोन महिन्यापूर्वीच गाझा येथील युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटी (DSS) मध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले होते. अनिल काळे हे युनायटेड नेशन्सचे स्टिकर लावलेल्या कारमधून प्रवास करत होते, त्यांच्या गाडीवर संयुक्त राष्ट्राचा झेंडाही लावण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल काळे यांनी 2022 मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या निवेदनानुसार, अनिल काळे हे त्यांच्या सहकाऱ्यासह युएनच्या वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना सकाळी हा हल्ला झाला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोकसंदेशही पाठवला आहे.
advertisement
वाचा - पीएम नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून भरला उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO
यूएनच्या सूत्रांनी सांगितले की, त्याच्या वाहनावर कोणी गोळीबार केला हे स्पष्ट झाले नाही. वैभव अनिल काळे यांच्यासोबत यूएनचा आणखी एक कर्मचारीही प्रवास करत होता. इस्रायल-गाझा संघर्षात संयुक्त राष्ट्रांचा जवान शहीद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच वेळी, अल जझीराच्या मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण गाझामध्ये इस्रायलच्या गोळीबारात आतापर्यंत एकूण 190 मदत कर्मचारी मरण पावले आहेत, त्यापैकी बहुतेक पॅलेस्टिनी आहेत. पण अनिल काळे हे गाझामध्ये गोळीबारात मृत्युमुखी पडलेले पहिले विदेशी यूएन कर्मचारी आहेत.
advertisement
त्याचवेळी, इस्रायलच्या सैन्य IDF ने देखील एक निवेदन जारी केले आहे की हा हल्ला सोमवारी रफाह भागात झाला आणि ते या गोळीबाराची आणि संयुक्त राष्ट्रांच्या मदत कर्मचाऱ्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
Gaza war: भारतीय निवृत्त कर्नल वैभव काळेंचा इस्रायल हल्ल्यात मृत्यू! इतिहासात पहिलीच घटना; जगभर खळबळ
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement