पीएम नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून भरला उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पंतप्रधान मोदी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.त्यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे.
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सकाळी 11.30 ते 12.30 या अभिजात मुहूर्तावर भरला आहे. नरेंद्र मोदी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.त्यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नरेंद्र मोदींकडून गंगापूजन केलं. दशाश्वमेध घाटावर गंगापूजन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी वाराणसीच्या कालभैरव मंदिरात आरती केली. त्यानंतर आता ते रोड शो करणार आहे. पीएम मोंदींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांचा बाहेर मोठा उत्साह पाहायला मिळाला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi files nomination from Varanasi Lok Sabha seat for #LokSabhaElections2024
Uttar Pradesh CM Yogi Adityanath is also present on the occasion. pic.twitter.com/Q9gz760L86
— ANI (@ANI) May 14, 2024
advertisement
पीएम मोदी फॉर्म भरत असताना त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यांनी फॉर्म भरण्याआधी एनडीएमधील नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित राहणार आहे. 5 किमीचा भव्य रोड शो करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये 11 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. नामांकनापूर्वी पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो केला. पंतप्रधान मोदींनी केला भव्य रोड शो, रोड शोमध्ये पंतप्रधानांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान मोदींच्या नामांकनात सहभागी होण्यासाठी वाराणसीला पोहोचले.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. चिराग पासवान यांचा पीएम मोदींच्या नामांकनात समावेश होणार आहे. पीएम मोदींच्या नामांकनात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. पीएम मोदींच्या नामांकनात जीतन राम मांझी उपस्थित होते.
Location :
Gujarat
First Published :
May 14, 2024 12:36 PM IST








