advertisement

BREAKING : अख्खं गाव हादरलं, स्फोटाने संपूर्ण फॅक्टरी उद्ध्वस्त 18 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Last Updated:

वेतलापलेम गावामध्ये दुपाराच्या सुमारास ही घटना घडली. अचानक एका फटाका उत्पादक कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला.

News18
News18
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एक फटाखा फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्यााची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये दुपाराच्या सुमारास ही घटना घडली. अचानक एका फटाका उत्पादक कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, अख्ख गाव हादरलं.  गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या स्फोटामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताचा घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी स्फोटाच्या घटनेवर दुख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत कार्य करण्याची सूचना केली आहे. ज्या फटाखा उत्पादक कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीमध्ये २० जण काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
काय घडलं नेमकं? 
काकिनाडा जिल्ह्यातील सामर्लकोटा इथं वेटलापालेम गाव आहे. या ठिकाणी शेताच्या बाजूला एक फटाका कारखाना आहे. दुपारच्या सुमारास अचानक फटाका फॅक्टरीमध्ये अचानक कुठल्या तरी कारणावरून स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे गाव हादरलं. दूरपर्यंत धक्के जाणवले. स्फोट झाला तेव्हा कंपनीमध्ये २० मजूर काम करत होते.  या स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी आहे.
advertisement
स्फोटाची माहिती मिळताच शेजारी गावातील लोकांनी घटनाास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी  बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री नायडूंनी व्यक्त केलं दु:ख
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.  काकिनाडा जिल्ह्यातील वेटलापालेम इथं फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे.  या अपघातात १८ जणांचा वृत वेदनादायी आहे. वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क साधला असून तातडीने मदत पुरवण्याचे आदेश दिले आहे. बचावकार्य सुरू आहे, मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार आहे, सर्वतोपरी मदत पुरवली जाईल, असं मुख्यमंत्री नायडू यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/देश/
BREAKING : अख्खं गाव हादरलं, स्फोटाने संपूर्ण फॅक्टरी उद्ध्वस्त 18 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement