'स्पा' च्या नावाखाली सुरु होता भलताच कांड, अचानक पोलिसांचा छापा अन् बिंग फुटलं, दृश्य बघून अधिकारीपण हैराण

Last Updated:

स्पा सेंटरची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील तीन स्पा सेंटरवर एकाच वेळी छापा टाकला, जिथे स्पाच्या नावाखाली भयंकर कांड सुरु होता.

News18
News18
Spa Centre Raid : स्पा सेंटरची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील तीन स्पा सेंटरवर एकाच वेळी छापा टाकला, जिथे स्पाच्या नावाखाली भयंकर कांड सुरु होता. हे दृश्य इतके धक्कादायक होत की पोलीस अधिकारीही हे दृश्य पाहून हैराण झाले. या स्पामध्ये नेमकं काय घडत होत हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. बाहेर बोर्ड जरी "स्पा आणि थेरपी" चा लिहिला होता तरी आत अनैतिक धंदे सुरु होते.
कुठे घडली घटना?
गुजरातमधील भावनगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील वाघावाडी रोडवरील तीन स्पा सेंटरवर एकाच वेळी छापा टाकला, जिथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिस पोहोचले तेव्हा आतील दृश्य पाहून अधिकारी हैराण झाले. मुली लहान केबिनमध्ये क्लायंटसोबत आढळल्या. ईवा सुरभी कॉम्प्लेक्समध्ये चालणाऱ्या या तीन स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की त्यांना या ठिकाणी बऱ्याच काळापासून बेकायदेशीर कृत्यांच्या तक्रारी येत होत्या. शनिवारी रात्री अचानक छापा टाकण्यात आला आणि संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. या कारवाईत दहा तरुणींची सुटका करण्यात आली, तर तिन्ही स्पाच्या संचालकांना अटक करण्यात आली.
advertisement
कोणी टाकले छापे?
नीलमबाग पोलिस, घोघ रोड पोलिस आणि मानव तस्करी विरोधी पथक (AHTU) यांच्या पथकांनी संयुक्तपणे तीन स्पा सेंटरवर एकाच वेळी छापे टाकले. इवा सुरभी मॉलमध्ये असलेल्या अवेदा, ओशन आणि आयकॉनिक या तीन स्पा सेंटरवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. पोलिसांना अनेक तरुण आणि महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या.
10 मुलींची सुटका, तीन व्यवस्थापकांना अटक
छाप्यादरम्यान, पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून एकूण 10 मुलींची सुटका केली. त्या सर्व वेगवेगळ्या राज्यांमधून आणल्या गेल्या होत्या. "स्पा सर्व्हिस" च्या नावाखाली ही ठिकाणे चालवणाऱ्या तीन स्पा सेंटरच्या व्यवस्थापकांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की ते आता या स्पा सेंटरच्या मालकांचा आणि नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत.
advertisement
सूत्रांनी दिलेली टीप
पोलिसांना या स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्यांबद्दल बऱ्याच काळापासून तक्रारी येत होत्या. अनेक दिवसांच्या देखरेखीनंतर, पथकाने नियोजन केले आणि एकाच वेळी छापा टाकला. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी आता वेश्याव्यवसाय विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कारवाई करत आहेत.
शहरातील वाढत्या "स्पा रॅकेट" विरोधात कडक भूमिका
भावनगर पोलिसांनी सांगितले की ते स्पा सेंटरच्या नावाखाली कार्यरत असलेल्या अशा रॅकेटवर कारवाई अधिक तीव्र करतील. कोणतेही सेंटर बेकायदेशीर कारवायांचे केंद्र बनू नये यासाठी पोलिस आता सर्व स्पा सेंटरची नोंदणी, परवाने आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करतील.
view comments
मराठी बातम्या/देश/
'स्पा' च्या नावाखाली सुरु होता भलताच कांड, अचानक पोलिसांचा छापा अन् बिंग फुटलं, दृश्य बघून अधिकारीपण हैराण
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement