Rising India Summit 2025: पुढील 5 वर्षांत AI रुग्णांवर उपचार करेल, रोबोटद्वारे केल्या जातील शस्त्रक्रिया
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Rising India Summit 2025: व्हायोनिक्स बायोसायन्सेस कंपनीचे सीईओ विवेक वाधवा यांनी रायझिंग इंडिया समिटमध्ये सांगितले की, भारत पुढील 5 वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार करू शकतो. लवकरच एआय डॉक्टरांप्रमाणे उपचार करताना दिसेल.
नवी दिल्ली: डेटाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे आणि या डेटाच्या आधारे, एआय चमत्कार करू शकते. पुढील 5-10 वर्षांत, एआय प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवेल आणि तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालयांमध्ये रोगांवर उपचार करताना दिसेल. भविष्यात, सूक्ष्म रोबोट शस्त्रक्रिया करतील आणि मोबाईल फोनद्वारे आरोग्य निरीक्षण करणे शक्य होईल. असे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक आणि व्हायोनिक्स बायोसायन्सेस कंपनीचे सीईओ विवेक वाधवा यांनी म्हटले आहे. न्यूज18 रायझिंग भारत समिटमध्ये असे सांगितले की, पुढील दशकात वैद्यकीय उद्योग आमूलाग्रपणे बदलू शकतो.
विवेक वाधवा म्हणाले की, स्वस्त वैद्यकीय उपकरणे तयार करण्याची भारताकडे चांगली संधी आहे. पाश्चात्य देश वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली अब्जावधी डॉलर्स लुटत आहेत, परंतु भारतीय शास्त्रज्ञ स्वस्त उपकरणे बनवून जगात आपला ठसा उमटवू शकतात. विवेक वाधवा म्हणाले की त्यांची कंपनी याच उद्देशाने काम करत आहे आणि कमी किमतीत विविध रोगांचे निदान करण्यासाठी लागणारी उपकरणे तयार करत आहे. येत्या काही वर्षांत भारतीय वैद्यकीय उद्योग आमूलाग्र बदलू शकतो. तुम्हाला रुग्णालयात एआय उपचार करताना दिसेल आणि सूक्ष्म रोबोट्सद्वारे शस्त्रक्रिया करताना दिसतील. हे सर्व खूप लवकर घडेल.
advertisement
ते म्हणाले की, भारताला जगात लीडर होण्याची संधी आहे. येथील शास्त्रज्ञांनी प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीसह देशभरातील विविध ठिकाणी सेन्सर बसवले तर अनेक समस्या सोडवता येतील. भारतात इंजिनियर्सपासून ते इतर क्षेत्रांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. जगात सर्वाधिक डेटा भारतात उपलब्ध आहे आणि जर त्याचा योग्य वापर केला तर एआयच्या मदतीने भारत प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवू शकतो. भारत विशेषतः वैद्यकीय शास्त्रामध्ये आपला ठसा उमटवू शकतो. भारतात अनेक समस्या आहेत, जर त्यामध्ये आता सुधारणा केल्या तर पाश्चात्य देशांकडून उपकरणे खरेदी करण्याची गरज भासणार नाही.
advertisement
भारतीय वंशाचे अमेरिकन सीईओ म्हणाले की, आजकाल सर्वच मोबाईल फोन्समध्ये आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी विविध सेन्सर्स असतात. लवकरच असे सेन्सर देखील उपलब्ध होतील जे कर्करोगासह सर्व आजारांचा शोध घेण्यास आणि त्यांचे निरीक्षण करण्यास मदत करतील. हे सेन्सर्स तुम्हाला 24*7 कनेक्टेड ठेवतील आणि अगदी प्रत्येक क्षणी आरोग्य अपडेट्स देतील. अनेक कंपन्या आता स्मार्टफोन आणि लॅपटॉपऐवजी अशा गॅझेट्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. या गोष्टींमध्ये भविष्यात वैद्यकीय उद्योगात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.
Location :
Delhi
First Published :
April 10, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/देश/
Rising India Summit 2025: पुढील 5 वर्षांत AI रुग्णांवर उपचार करेल, रोबोटद्वारे केल्या जातील शस्त्रक्रिया