नकली नक्षलवादी बनून वडिलांना लुटायचा प्लॅन, चिठ्ठी पाठवून जीवे मारण्याची दिली धमकी, पोलिसांनी थेट…
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
लालसेपोटी एखादी व्यक्ती कोणतीही चूक करू शकते अशीच एक घटना घडली आहे. आजकाल गुन्हेगारी इतकी वाढली आहे की गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी नवनवीन पद्धत वापरत आहे.
Crime News : लालसेपोटी एखादी व्यक्ती कोणतीही चूक करू शकते अशीच एक घटना घडली आहे. आजकाल गुन्हेगारी इतकी वाढली आहे की गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी नवनवीन पद्धत वापरत आहे. असच काहीसं घडलं. नारला पोलिस स्टेशन परिसरातील रूपारा रोड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, एका मुलाने नक्षलवादी असल्याचे भासवून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या वडिलांना धमकीचे पत्र पाठवले.
नक्षलवादी संघटनेच्या नावाने पत्र पाठवले
वृत्तानुसार, ओडिशातील रूपा रोडचे कंत्राटदार दिनेश अग्रवाल यांचा 24 वर्षीय मुलगा अंकुश अग्रवाल याने त्याच्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी एक विचित्र आणि धोकादायक पद्धत वापरली. 6 ऑक्टोबर रोजी त्याने एका नक्षलवादी संघटनेच्या नावाने एक पत्र लिहिले आणि ते त्याच्या वडिलांच्या गाडीत ठेवले. पत्रात लिहिले होते, "ताबडतोब 35 लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मारले जाईल." शिवाय, प्रकरण खरे असल्याचे दाखवण्यासाठी अंकुशने त्याच्या वडिलांच्या मित्रालाही असेच धमकीचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाल्यावर दिनेश अग्रवाल आणि त्याचे कुटुंब हताश झाले. सर्वांना भीती आणि तणावाने ग्रासले होते. हे पत्र खऱ्या नक्षलवाद्यांनी लिहिले आहे असे समजून, त्याच्या वडिलांनी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली आणि नारला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
advertisement
कसा झाला संपूर्ण प्रकरणाचा खुलासा?
पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला हे प्रकरण गंभीर मानले जात होते, कारण या भागात यापूर्वीही नक्षलवाद्यांच्या धमक्या आल्या होत्या. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसे सत्य हे चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नसल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयावरून एका तरुणाला ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान संपूर्ण गूढ उघड झाले. अंकुश अग्रवालने पोलिसांना कबूल केले की त्यानेच धमकीचे पत्र लिहिले होते आणि त्याच्या वडिलांना धमकावून पैसे उकळण्याची योजना आखली होती.
advertisement
पोलिसांनी अंकुश अग्रवालला अटक केली
view commentsयानंतर पोलिसांनी अंकुश अग्रवालला अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांचे म्हणणे आहे की हे प्रकरण कौटुंबिक वादाचे असले तरी, नक्षलवादी संघटनेच्या नावाचा गैरवापर केल्याने हा गुन्हा गंभीर मानला जात आहे. मुलाने ही योजना एकट्याने रचली होती की दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून, हे निश्चित करण्यासाठी पोलिस सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/देश/
नकली नक्षलवादी बनून वडिलांना लुटायचा प्लॅन, चिठ्ठी पाठवून जीवे मारण्याची दिली धमकी, पोलिसांनी थेट…