advertisement

Supreme Court : धर्मांतर केलं तर आरक्षण विसरा! 'या' धर्मात प्रवेश केल्यास SC दर्जा होणार रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Last Updated:

Supreme Court : देशातील आरक्षण आणि अनुसूचित जातीच्या (SC) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

धर्मांतर केलं तर आरक्षण विसरा! 'या' धर्मात प्रवेश केल्यास SC दर्जा होणार रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
धर्मांतर केलं तर आरक्षण विसरा! 'या' धर्मात प्रवेश केल्यास SC दर्जा होणार रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नवी दिल्ली: देशातील आरक्षण आणि अनुसूचित जातीच्या (SC) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म (उदा. ख्रिश्चन किंवा इस्लाम) स्वीकारल्यास संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे धर्मांतरित व्यक्तींना आता 'अॅट्रोसिटी' कायद्यांतर्गत संरक्षण मिळण्याचा मार्गही बंद झाला आहे. सु्प्रीम कोर्टाच्या निकालाचे मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल?

न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला. न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधानातील तरतुदींनुसार केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मीय व्यक्तीच अनुसूचित जातीचा दर्जा मिळवण्यास पात्र असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जर एखादी व्यक्ती ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झाली, तर ती अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (Atrocity Act) लाभ घेऊ शकणार नाही.
advertisement

काय आहे प्रकरण?

आंध्र प्रदेशातील पादरी चिंथदा आनंद यांनी दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने हा निकाल दिला. आनंद यांनी काही व्यक्तींविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आनंद हे गेल्या १० वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचे पालन करत असून ते पादरी म्हणून काम करत असल्याचे समोर आले. आंध्र प्रदेश हायकोर्टाने त्यांचा 'अनुसूचित जाती'चा (SC) दर्जा नाकारून एफआयआर रद्द केला होता, तोच निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
advertisement

आरक्षणाचे नियम स्पष्ट

सुप्रीम कोर्टाने नमूद केले की, ख्रिश्चन धर्मात अधिकृतपणे जातिव्यवस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली व्यक्ती अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बाळगत असली, तरी तिला कायद्याचे संरक्षण देता येणार नाही. केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात राहिलेल्या दलितांनाच हा दर्जा आणि त्यासंबंधित सवलती लागू राहतील, असे न्यायालयाने अधोरेखित केले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Supreme Court : धर्मांतर केलं तर आरक्षण विसरा! 'या' धर्मात प्रवेश केल्यास SC दर्जा होणार रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement