advertisement

उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव, महाराष्ट्रातील 10 भाविक अडकले, बचावकार्य सुरू

Last Updated:

नांदेडचे दहा जण उतराखंडमध्ये अडकले असून त्यातील एका युवकाने व्हिडीओ करुन ही माहिती दिली.

News18
News18
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड:  उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली गावात ढगफुटीसारखा पाऊस आणि भूस्खलनामुळं हाहाकार उडालाय.. या धगफुटीमुळं धराली गावातील अनेक घरं आणि बिल्डिंग जमीनीखाली गाडली गेलीत.या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तर, यामध्ये महाराष्ट्रातील दहा भाविकही अडकल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेडचे दहा जण उतराखंडमध्ये अडकले असून त्यातील एका युवकाने व्हिडीओ करुन ही माहिती दिली. सचिन पत्तेवार या नांदेडच्या युवकाने उतराखंड मधील परिस्थिती बाबत माहिती दिली. सचिन पत्तेवार सोबत एकूण दहाजण उतराखंडला गेले होते .अतिवृष्टी आणि ढगफुटी झाल्याने तिथे सर्वच नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे रस्ते देखील बंद असून आम्ही सर्व जण अडकलो असल्याचे सचीन पत्तेवार या युवकाने सांगितले .
advertisement

सर्वजण सुखरुप

सात जण एका ठिकाणी तर तीन जण अन्य एका ठिकाणी अडकल्याचे सचिनने सांगितले. त्याने घटना स्थळाचा व्हिडियो देखील पाठवला . सगळेजण सुखरूप असल्याचे सचिन याने सांगितले. सध्या सचिन आणि त्याचे दोन मित्र हनुमान चट्टी येथे आहेत तर अन्य सात जण यमनोत्री येथे आहेत. १ ऑगस्टला नांदेडचे हे दहा जण चार धाम यात्रेसाठी उतराखंडला गेले आहेत.
advertisement

काही क्षणात सगळं वाहून गेलं...

डोंगरावर ढफुटीनंतर डोंगरावरून तो पाण्याचा प्रवाह खाली आला होता अन् बघता बघता त्यानं अक्राळ विक्राळ रुप धारण केलं होतं. त्यामुळे अवघ्या काही क्षणात सगळ्या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलं. घरं आणि इमारती त्या गाळात बुडाल्या.या घटनेची माहिती मिळताच सरकारनं मदत आणि बचावकार्य सुरू केलं...(VIS) पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथक मदतीसाठी दाखल झाली आहेत. बेसुमार जंगलतोड आणि काँक्रिटचं वाढलेलं जंगल यामुळे गेल्या काही वर्षांत उत्तराखंडमध्ये ढगफुटीचे प्रकार वारंवार घडत आहे. निसर्गाकडून दिल्या जाणाऱ्या या इशाऱ्याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव, महाराष्ट्रातील 10 भाविक अडकले, बचावकार्य सुरू
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement