Uttarkashi Tunnel Rescue : 41 जीव, दिवसरात्र मेहनत, बचावासाठी संघर्ष आणि कुटुंबाचा संयम... डोंगराला भेदून कसं जिंकलं युद्ध? Inside Story

Last Updated:

Uttarkashi Tunnel Rescue Operation Latest Updates : उत्तरकाशीच्या सिल्कयारा येथे निर्माण झालेल्या बोगद्याच्या संकटात बचाव पथकाने युद्ध मोहीम राबून भीमपराक्रम केला आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या धाडसाचंही कौतुक करावं लागेल. हलके अन्न खाऊन 17 दिवस बोगद्यात बंदिस्त राहिलेल्या कामगारांनी जीवनाची आशा सोडली नाही. त्यांच्या धाडसानेच बाहेर काम करणाऱ्या लोकांचा उत्साह द्विगुणित केला.

डोंगराला भेदून कसं जिंकलं युद्ध? Inside Story
डोंगराला भेदून कसं जिंकलं युद्ध? Inside Story
डेहराडून, 28 नोव्हेंबर : मागील 17 दिवसांपासून उत्तराखंड येथील सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका बाजूला डोंगरासारखे बोगद्याचे संकट तर दुसरीकडे जीव वाचवणाऱ्यांचे धाडस. ही लढाई खूप कठीण होती. बंद बोगद्यातील 41 कामगारांनी हिंमत दाखवली. शेकडो धाडसी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतून 41 कुटुंबांच्या डोळ्यात आशेचा किरण उजळून टाकला. 17 दिवसांत उत्तरकाशीतील बचाव पथकाने भीमपराक्रम केला.
13 नोव्हेंबरला सिल्कयारा बोगद्यात 41 जीव अडकल्याची बातमी आली, तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी लागणारी यंत्रे देशाच्या विविध भागातून आणण्यात आली. यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली. रेल्वे-रस्त्यापासून जी काही सुविधा हवी होती, ती सुविधा उत्तरकाशीपर्यंत पोहोचली. SDRF ते NDRF, बीआरओपासून ते आयटीबीपीपर्यंत आणि हवाई दलापासून पोलीस प्रशासनापर्यंत सर्वांनी आपापली ताकद लावली.
advertisement
ना दिवस पाहिला ना रात्र, ना अन्नाची चिंता, ना झोपेची. कडाक्याच्या थंडीत टेकड्यांमधून बचाव पथकातील प्रत्येक सदस्याने जीव झोकून दिला. गरज पडेल तेव्हा डोंगर कापले. आवश्यक तिथे ते बोगद्यात शिरले. यंत्र तुटल्यावर लगेच दुरुस्त करण्यात आले. रस्त्यात येणारं प्रत्येक गोष्ट हटवण्यात आली.
दिल्लीपासून डेहराडूनपर्यंत, पीएमओपासून ते सीएमओपर्यंत, जिल्ह्यापासून ते विभागापर्यंत, मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पोलिसांपासून प्रशासनापर्यंत केवळ एका मिशनवर 24 तास काम केले गेले. 41 लोकांचे प्राण वाचवण्याचे हे मिशन होते. या बचावातील अडथळे दूर करण्यासाठी देश-विदेशातून गरज असेल तेथे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. कामगारांना जिवंत बाहेर काढणे हे पहिले लक्ष्य होते.
advertisement
4 इंच पाईपद्वारे 9 दिवस मुरमुरे आणि सुका मेवा पुरवल्याने बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे प्राण वाचले. अखेर 6 इंची पाईप कामगारांपर्यंत पोहोचवण्यात बचाव पथकाला यश आले. या एका यशाने कामगारांचे मनोबल उंचावले. बचाव पथकाचे मनोबल उंचावले आणि कामगारांच्या कुटुंबीयांच्या आशाही वाढल्या. 41 जीव वाचवण्याची जिद्द इतकी मोठी होती की एकाच वेळी 6-6 योजनांवर काम सुरू झाले. बोगद्याच्या दोन्ही तोंडातून उत्खनन सुरू झाले. बोगद्याच्या वर दोन ठिकाणी उत्खनन करण्यात आले. बचावासाठी उचलण्यात आलेले पहिले पाऊल यशस्वी झाले.
advertisement
पहिल्याच दिवसापासून उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना बाहेर काढण्याच्या मार्गात अनेक अडथळे आले. अपघातानंतर बचावकार्य सुरू होताच, काही तासांतच मशीनमध्ये बिघाड झाला. यानंतर दिल्लीहून तात्काळ अमेरिकन ऑगर मशीन मागवण्यात आली. तेव्हापासून याच मशीनच्या सहाय्याने डोंगरात छिद्र पाडून 41 जणांचा जीव वाचवण्याची लढाई सुरू होती.
advertisement
बचावकार्यात 'ऑगर'ची मोठी भूमिका
घटना घडल्यानंतर घटनास्थळी उपलब्ध सुविधांमधून बचावकार्य सुरू केले असता काही तासांतच मशीनमध्ये बिघाड झाला. बचाव पथकाने मोठ्या मशीनची गरज असल्याचे सांगितले. ताबडतोब अमेरिकन ऑगर मशीन दिल्लीहून उत्तरकाशीला हवाई दलाच्या विशेष विमानाने नेण्यात आले. डोंगरात छिद्र पाडून त्याचा ढिगारा शेकडो फूट बाहेर फेकण्याची क्षमता असलेले हे यंत्र बचावकार्यात महत्त्वाचे ठरले. मात्र, ऑगरमशीनच्या समोर मोठा खडक आल्याने ड्रिलिंग बंद करावे लागले.
advertisement
त्यानंतर TBM मशीन आणण्यात आले. हे ऑगर मशीन बोगदा करताना वापरल्या जाणार्‍या TBM मशीनपेक्षा लहान होती. कारण TBM मशीन जेव्हा सुरू होते तेव्हा मार्गात येणारा कोणताही अडथळा त्याचा मार्ग रोखू शकत नाही. बाटलीच्या फिरत्या टोपीप्रमाणे, टीबीएमचे कटर डोंगर, खडक, वाळू आणि माती कापत राहतात आणि बोगद्याभोवती फ्रेमिंग देखील करतात, जेणेकरून बोगदा पडू नये. पण सिल्कयारा बोगद्यात टीबीएम ऐवजी छोटे ऑजर मशीन बसवण्यात आले, जे केवळ खोदकाम करून डिगारा बाहेर काढण्याचे काम करते.
advertisement
बोगद्यात 900 मिमी पाईप
मशीनने केलेल्या छिद्रांमध्ये 900 मिमी व्यासाचे लांब पाईप्स घातले गेगे, ज्याद्वारे कामगारांना बाहेर काढण्याची तयारी केली गेली. बोगद्यातून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हे अभियान किती अवघड होते, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की अवघे 12 मीटरचे अंतर कापण्यासाठी 12 तास लागतील, असे सांगण्यात आले. रेस्क्यू टीम सिल्कयारा बोगद्यातील जीव आणि धोका यांच्यातील अंतर कमी करत राहिली. ही दरी लवकरात लवकर संपुष्टात यावी, अशी प्रार्थना सारा देश करत होता.
17 दिवसांनंतर जेव्हा सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांची स्पष्ट छायाचित्रे जगासमोर आली तेव्हा त्या मजुरांचे धाडस उघड झाले. बोगद्याबाहेरील लोकांची मानसिक स्थिती कशीही असली तरी बोगद्याच्या आत उपस्थित कामगारांनी संयम आणि धैर्य दाखवले होते. पहिल्यांदाच सिल्कयारा बोगद्यातील 12 मजुरांची स्पष्ट छायाचित्रे समोर आली आणि सर्व मजुरांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या.
मराठी बातम्या/देश/
Uttarkashi Tunnel Rescue : 41 जीव, दिवसरात्र मेहनत, बचावासाठी संघर्ष आणि कुटुंबाचा संयम... डोंगराला भेदून कसं जिंकलं युद्ध? Inside Story
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement