advertisement

Crime : 'त्या' फोटोंनी घेतला जीव; कल्याणमधील 45 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

Last Updated:

Kalyan Crime : सायबर गुन्ह्यांचा प्रकार किती त्रासदायक असू शकतो ते सध्या कल्याणमधील समोर आलेल्या घटनेने सिद्ध झाले आहे.

ब्लॅकमेलिंगमुळे नैराश्यात गेलेल्या कल्याणमधील 45 वर्षीय व्यक्तीने जीवन सपविले आहे.
ब्लॅकमेलिंगमुळे नैराश्यात गेलेल्या कल्याणमधील 45 वर्षीय व्यक्तीने जीवन सपविले आहे.
कल्याण : सायबर गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार कल्याणमधून समोर आलेला आहे. ज्यात सायबर ब्लॅकमेलिंगलच्या त्रासाला कंटाळून 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे.
घरच्यांमुळे समोर आला गुन्हेगार
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व घटना विठ्ठलवाडी परिसरातील आहे.जिथं राहणाऱ्या हेमंत दयाशंकर पांडे (वय45) यांनी दोन महिन्यांपू्र्वी त्यांच्या जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पण घटनेनंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण हेमंत यांच्या घरच्यांच्या मनात त्यांनी अचानक आत्महत्या का केली असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याबाबत पुन्हा हेमंत यांचे मोठे भाऊ राजेश पांडेनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
advertisement
कारण जाणून घेण्यासाठी कुटुंबीयांची धावाधाव
घरातील एका मुलाने केलेल्या आत्महतेमुळे घरातील संपूर्ण हादरुन गेले होते मात्र त्यातही यामागील खरं कारण शोधण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न सुरु केले. ज्यात पहिल्यांदा त्यांनी हेमंतच्या मित्रांशी संपर्क केला तेव्हा हेमंत कोणत्या तरी सायबर गुन्हाच्या जाळ्यात अडकला असल्याची शक्यता व्यक्त केली यातून सुटण्यासाठी त्यावेळी हेमंतने मित्राकडे पैशांची मागणी केली होती.
advertisement
इथूनच प्रकरणाला नवं वळण
मित्राने दिलेल्या माहितीनंतर हेमंतच्या कुटुंबियांनी त्याते बँक खाते तपासले असता एप्रिल 2025 ते जून 2025 या दिवसांत मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आणि ही रक्कम अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यातून वळवल्याचा संशय सुरुवातीस व्यक्त करण्यात येत होता आणि वारंवार पैशांच्या मागणीसह बदनामीच्या भीतीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आणि या प्रकरणी तिसऱ्यांदा अज्ञात व्यक्तीविरुद्द तक्रार दाखल केली आहे.
advertisement
गूढ उलगडलं
तक्रार दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी हेमंतच्या मोबाईल फोनची आणि ई-मेलची संपूर्ण तपासणा केली असता एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्यात एका ईमेलद्वारे त्यांना त्यांचे अश्लील फोटो पाठवण्यात आले होते. हे सर्व फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी वारंवार दिली जात होतो. एवढेच नाही तर मोबाईलच्या मेसेजमध्येही अशाच अनेक धमक्या आढळून आल्या आणि सततच्या धमक्यांमुळे मानसिक तणावात गेलेल्या व्यक्तीने टोकाचे पाऊन उचलले असून हा सर्व प्रकार पाहून कुटुंबीय हादरुन गेले .
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Crime : 'त्या' फोटोंनी घेतला जीव; कल्याणमधील 45 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement