advertisement

Shiv Mandir: मुंबईजवळ आहे 966 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर, महाशिवरात्रीला इथं नक्की भेट द्या, असं पोहोचाल!

Last Updated:

Ambernath Shiv Mandir: महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू असून मोठ्याप्रमाणावर भाविक इथे दर्शनाकरिता येत असतात.

Shiv Mandir: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या शिवमंदिरात कसं जाल? संपूर्ण रूट्स जाणून घ्या, एका क्लिकवर
Shiv Mandir: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या शिवमंदिरात कसं जाल? संपूर्ण रूट्स जाणून घ्या, एका क्लिकवर
ठाणे: महाशिवरात्रीसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शिवभक्त मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये असलेल्या ठिकाणी जाऊन शंकराचे दर्शन घेताना दिसत आहेत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शिव मंदिर आहेत, तिथे दर्शनासाठी मुंबईकर मोठ्याप्रमाणे जात असतात. जर तुम्ही ठाण्याच्या अलीकडे राहायला असाल आणि तुम्हालाही शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सुद्धा सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर फार प्राचीन असून मुंबईसह उपनगरातून भाविक इथे दर्शनाकरिता येत असतात. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये सध्या जय्यत तयारी सुरू असून मोठ्याप्रमाणावर भाविक इथे दर्शनाकरिता येत असतात.
अंबरनाथच्या शिवमंदिरात कसं जायचं?
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये हे प्राचीन शिव मंदिर आहे. अंबरनाथला जाण्यासाठी जर तुम्ही मुंबईवरून जाणार असाल तर मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरून खोपोली, कर्जत, बदलापूर किंवा अंबरनाथ या लोकल पकडू शकता. जलद किंवा धीमी लोकल पकडलीत तरी सुद्धा चालेल. तुम्हाला अंबरनाथला पोहोचण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागतो. अंबरनाथ पूर्वेमध्ये हे मंदिर असून तुम्हाला पुढे जाण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून रिक्षा ऑटो देखील मिळते. रेल्वे स्थानकावरून शिव मंदिरामध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षा सुविधा उपलब्ध असतात. तिथून तुम्ही रिक्षाने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. मंदिरामध्ये जाण्यासाठी एका व्यक्तीचं 15 ते 20 रूपये इतकं भाडं आहे. अंबरनाथ स्टेशनपासून मंदिरामध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्षाने 9 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो.
advertisement
966 वर्षे जुनं असलेल्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी असते. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्राही त्याच दिवशी भरली जाते. जत्रेनिमित्त प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर ट्रस्ट जोरदार तयारी केले जाते. शिवाय, अनेक बडे सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचीही यावेळी रेलचेल पाहायला मिळते. फक्त महाशिवरात्रीच्या वेळी नाही तर, इतरत्र वेळीही शिवमंदिरामध्ये भाविकांची रेलचेल असते. भाविकांच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर ट्रस्टकडून पुर्णपणे तयारी सुरू आहे. पाणी, प्रसाद यांसह इतरत्र गोष्टींची सोय सुद्धा मंदिर प्रशासनाकडून केली जात आहे. मंदिरामध्ये दर्शनाकरिता येणार्‍या भाविकांसाठी मंदिर परिसरामध्ये मंडप घालण्यात आला आहे. भाविकांच्या दर्शनासाठी एकत्रितपणे गर्दी होऊ नये, याची काळजी मंदिर प्रशासनाकडून घेतली जात आहे.
advertisement
मंदिर परिसरामध्ये चेंगरा चेंगरी सदृश परिस्थिती होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून काळजी घेतली जात आहे. शिव मंदिर परिसरात स्वच्छतेची ही मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली गेली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shiv Mandir: मुंबईजवळ आहे 966 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर, महाशिवरात्रीला इथं नक्की भेट द्या, असं पोहोचाल!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement