advertisement

'सेवा तीर्था'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमधून उमटले सेवाभावाचे प्रतिबिंब

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थ येथे शेतकरी, महिला, युवा आणि असुरक्षित नागरिकांसाठी पीएम राहत योजना, लखपती दीदी, कृषी निधी, Startup India FoF 2.0 मंजूर केली.

News18
News18
पंतप्रधान  कार्यालय सेवा तीर्थ इथे स्थलांतरित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या निर्णयांमध्ये सेवाभावाचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या फायलींवर केल्या  स्वाक्षरी;  यामध्‍ये  शेतकरी, महिला, युवा वर्ग आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित श्रेणीत येणारे  नागरिक – अशा समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे  घेतले निर्णय
1. प्रधानमंत्री राहत (पीएम  राहत) योजना: प्रत्येक नागरिकासाठी जीवनरक्षक संरक्षण कवच
पंतप्रधानांनी आज प्रधानमंत्री राहत योजना सुरू करायला मंजुरी दिली. या उपक्रमांतर्गत, अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे ‘कॅशलेस’ उपचार मिळतील. तातडीच्या वैद्यकीय मदतीअभावी कोणताही जीव गमवावा लागू नये, याची सुनिश्चिती या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
2. लखपती दीदींचे उद्दिष्ट दुप्पट करून 6 कोटींवर
सरकारने मार्च 2027 या मूळ कालमर्यादेच्या एक वर्ष आधीच 3 कोटी लखपती दीदींचा टप्पा ओलांडला आहे. पंतप्रधानांनी आता मार्च 2029 पर्यंत 6 कोटी लखपती दीदींचे नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच या योजनेची व्याप्ती आणि आकांक्षाचाही दुप्पटीने विस्तार केला आहे.
advertisement
3. शेतकऱ्यांना मोठा दिलासा : कृषी पायाभूत सुविधा निधीचे कर्ज उद्दिष्ट दुप्पट करून 2 लाख कोटी रुपये
भारताच्या संपूर्ण कृषी मूल्य साखळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधानांनी कृषी पायाभूत सुविधा निधीचे कर्ज उद्दिष्ट 1 लाख कोटी रुपयांवरून दुप्पट करून 2 लाख कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे.
4. 10,000 कोटी रुपयांच्या राखीव निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 : नेक्स्ट जनरेशन नवोन्मेषाची लाट
भारताच्या नवोन्मेषविषयक परिसंस्थेला , विशेषतः डीप टेक, प्राथमिक स्तरावरील कल्पना , प्रगत उत्पादन आणि अत्यावश्यक तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी 10,000 कोटी रुपयांच्या राखीव निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स  2.0 (Startup India FoF 2.0) ला मंजुरी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'सेवा तीर्था'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमधून उमटले सेवाभावाचे प्रतिबिंब
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement