advertisement

HSRP : तुमच्या गाडीची नंबर प्लेट 'ओरिजिनल' की बनावट'? बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

Last Updated:
बनावट नंबर प्लेट तयार करण्याचा कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले असून, यामुळे वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
1/7
आजच्या काळात रस्ते सुरक्षा आणि वाहनांची चोरी रोखण्यासाठी सरकारने HSRP (High-Security Registration Plate) म्हणजेच हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. ही प्लेट केवळ अधिकृत विक्रेत्यांकडेच मिळते आणि तिचा मुख्य उद्देश म्हणजे वाहनाला एक वेगळी ओळख देणे आणि सुरक्षितता वाढवणे हा असतो. मात्र, याच हाय-सिक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

2/7
कोल्हापूर जिल्ह्यात चक्क बनावट नंबर प्लेट तयार करण्याचा कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले असून, यामुळे वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

3/7
नेमकी घटना काय?कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) एका गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, हातकणंगले तालुक्यातील साजणी गावात बनावट नंबर प्लेट तयार करण्याचा काळाबाजार सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साजणी गावातील एका घरावर छापा टाकला.

4/7
या छाप्यात संतोष यादव नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घरीच चक्क बनावट नंबर प्लेट बनवण्याचे युनिट सुरू केल्याचे दिसून आले. तो हुबेहूब ओरिजिनल दिसतील अशा बनावट 'अँकर HSRP' नंबर प्लेट तयार करत होता. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, यामध्ये नंबर प्लेट बनवण्याचे मशिनरी आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

5/7
HSRP नंबर प्लेटवर काही विशेष सुरक्षा मानके असतात, जी सरकारकडे नोंदणीकृत असतात. आरोपी संतोष यादव हा आधुनिक मशिनरींचा वापर करून हुबेहूब अशाच प्लेट्स बनवत होता. लोक एजंटवर विश्वास ठेवून किंवा स्वस्त दरात काम होतेय म्हणून अशा अनधिकृत ठिकाणाहून प्लेट बनवून घेतात. मात्र, या प्लेट्स अधिकृत डेटाबेसमध्ये नोंदणीकृत नसतात, ज्यामुळे भविष्यात वाहन मालकाला कायदेशीर संकटाचा सामना करावा लागू शकतो.

6/7
ओरिजिनल HSRP कशी ओळखावी?1. होलोग्राम: प्लेटच्या डाव्या बाजूला निळ्या रंगाचा 'IND' लिहिलेला क्रोमियम होलोग्राम असतो. 
2. लेझर कोड: प्रत्येक प्लेटवर 10 अंकी लेझर आयडेंटिफिकेशन नंबर असतो, जो लेझरने कोरलेला असतो.
3. रिवेट्स: ही प्लेट गाडीला लावताना अशा प्रकारे लॉक केली जाते की ती पुन्हा काढता येत नाही. साध्या नट-बोल्टने लावलेली प्लेट HSRP नसते.
4. निळा 'IND' मार्क, हा मार्क हॉट स्टॅम्पिंग करून बसवलेला असतो, जो सहज पुसला जात नाही.
ओरिजिनल HSRP कशी ओळखावी?1. होलोग्राम: प्लेटच्या डाव्या बाजूला निळ्या रंगाचा 'IND' लिहिलेला क्रोमियम होलोग्राम असतो.2. लेझर कोड: प्रत्येक प्लेटवर 10 अंकी लेझर आयडेंटिफिकेशन नंबर असतो, जो लेझरने कोरलेला असतो.3. रिवेट्स: ही प्लेट गाडीला लावताना अशा प्रकारे लॉक केली जाते की ती पुन्हा काढता येत नाही. साध्या नट-बोल्टने लावलेली प्लेट HSRP नसते.4. निळा 'IND' मार्क, हा मार्क हॉट स्टॅम्पिंग करून बसवलेला असतो, जो सहज पुसला जात नाही.
advertisement
7/7
वाहनधारकांसाठी महत्त्वाचा सल्लाजर तुम्ही तुमची नंबर प्लेट कोणत्याही स्थानिक दुकानातून किंवा अनधिकृत एजंटकडून बनवून घेतली असेल, तर ती बनावट असू शकते. बनावट नंबर प्लेट लावणे हा गुन्हा आहे आणि पोलीस तपासणीत किंवा अपघाताच्या वेळी तुमची गाडी 'अनधिकृत' ठरू शकते. त्यामुळे नेहमी अधिकृत आरटीओ (RTO) पोर्टलवरून किंवा शोरूममधूनच आपली नंबर प्लेट बुक करा.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement