advertisement

Mumbai Metro : मोठी बातमी! गुंदवली स्थानकावर मेट्रो ठप्प, प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

Last Updated:

Mumbai Metro Update : तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोच्या रेड लाईनची सेवा काही काळ ठप्प झाली. सध्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Metro Red Line service disruption today
Mumbai Metro Red Line service disruption today
मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई मेट्रोच्या रेड लाईनवर तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. गुंदवली मेट्रो स्थानकावर गाडी सुमारे 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
सकाळच्या गर्दीत मुंबईकरांचे हाल
मिळालेल्या माहितीनुसार, ही मेट्रो सकाळी 10 वाजून 48 मिनिटांनी गुंदवली स्थानकावर येणे अपेक्षित होते. मात्र ती 10 वाजून 50 मिनिटांनी स्थानकात दाखल झाली. त्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो पुढे जाऊ शकली नाही आणि ती स्थानकावरच थांबून राहिली.
गाडी बराच वेळ थांबल्यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले. काही प्रवाशांनी परिस्थितीबाबत विचारणा केली. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत प्रवाशांना सुरक्षितपणे मेट्रोमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानकावर सुरक्षा कर्मचारी आणि तांत्रिक पथक तैनात करण्यात आले आहे.
advertisement
या घटनेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai Metro : मोठी बातमी! गुंदवली स्थानकावर मेट्रो ठप्प, प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement